Download App

डॉ. अतुलबाबा भोसलेंची ताकद वाढली, जिल्हा कुस्तीगीर संघाने दिला जाहीर पाठिंबा

जिल्हा कुस्तीगीर संघाने कराड दक्षिण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठींबा दिला.

  • Written By: Last Updated:

Dr. Atulbaba Bhosale : कराड तालुक्यातील सुपुत्रांनी कराडचे नाव कुस्ती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. त्यांचा आदर्श ठेवून इथली युवा पिढी कुस्तीचे धडे गिरवते. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियमप्रमाणे (Chhatrapati Shivaji Maharaj Cricket Stadium) महायुतीच्या (Mahayuti) सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये कुस्तीगीरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम उभारणार अशी ग्वाही डॉ. अतुलबाबा भोसले (
Dr. Atulbaba Bhosale) यांनी दिली. वाठार येथे कराड दक्षिण मतदारसंघातील कुस्तीगीरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघाने डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठींबा दिला.

पुष्पा 2 चा ग्रँड ट्रेलर ‘या’ दिवशी होणार लाँच होणार, रश्मिका मंदान्नाने डबिंगला केली सुरुवात 

याप्रसंगी रेठरे बुद्रुकचे माजी सरपंच पैलवान बबनराव दमामे, पैलवान आनंदराव मोहिते, दादासो थोरात, राजाराम यादव, साहेबराव करांडे, अशोक नलवडे, आनंदराव मोहिते, हिंदुराव पाटील, अरुण थोरात, धनंजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अतुलबाबा भोसले पुढे म्हणाले, शेतकरी कुटुंबातील एक मुलगा पैलवान करायचा असेल तर संपूर्ण कुटुंब त्यासाठी परिश्रम घेत असत. आपल्या भागातील अनेक मुलं कोल्हापूरला नामांकित तालमीत सराव करत असतात. पैलवान व्हायला मोठे कष्ट लागतात. आमच्या कुटुंबातील सर्व लोकांना पैलवान मंडळीविषयी आदर आहे. तीन पिढया आम्ही हा स्नेह जोपासत आहेत.

यशोमती ठाकूर यांचे हात बळकट! बहुजन महापार्टीच्या हर्षवर्धन खोब्रागडेंनी दिला बिनशर्त पाठिंबा 

दरवर्षी राज्यस्तरावरील कुस्ती स्पर्धा घेणार…
कराडमधून ऑलम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव, पैलवान संजय पाटील, पैलवान मारुतीराव कापूरकर यांनी आपल्या कराडच्या नावलौकिकात भर टाकली. त्यांचा आदर्श युवा पिढी घेवून कुस्ती क्षेत्रात नवनवीन यशाची शिखरे गाठत आहे. येत्या काळात दरवर्षी राज्यस्तरावरील कुस्ती स्पर्धा घेणार असून, कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रातील पैलवानांसाठी स्पर्धा चालू करण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहे, अशी ग्वाही डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.

दहा हत्तीचं बळ मिळाले
तसेच छत्रपती शिवाजी स्टेडियमप्रमाणे सरकारच्या माध्यमातून लागेल तेवढा निधी पैलवान बांधवांसाठी आणणार आहे. सर्वसोयीनियुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीही प्रयत्न करणार. आपण सर्व पैलवानांनी मेळावा घेऊन मला पाठिंबा दिला त्यामुळं दहा हत्तीचं बळ मिळाले आहे, असे प्रतिपादन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

अतुलबाबा भोसलेंना आमचा पाठिंबा- जिल्हा कुस्तीगीर संघ
पैलवानांना कौतुकाची फक्त थाप लागते बाकी काही लागत नाही. भोसले कुटुंबियांच्या तीन पिढ्या पैलवानांना प्रोत्साहन देत आहेत. भोसले कुटुंबाने आम्हा पैलवानांना वेळोवेळी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली आहे. आम्ही ह्या निवडणुकीत डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत, अशी भावना पैलवानांनी व्यक्त केली. यावेळी सर्व पैलवानांनी शपथ घेत डॉ. अतुलबाबा भोसले यांना विजयी करण्याचा निर्धार केला.

जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने कराड दक्षिण मतदारसंघाचे भाजपा- महायुतीचे उमेदवार डॉ अतुलबाबा भोसले यांना पाठिंबा देणारे पत्र देण्यात आले. यावेळी पैलवान धनाजी साळुंखे (मनव), निवास मंडले(मनव), भगवान यादव (कासारशिरंबे ), शंकर जाधव (आटके) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी धनंजय पाटील, आदित्य शिंदे, सचिन पाचूपते, प्रमोद पाटील, सचिन बागट, यशवंत थोरात, बबनराव दमामे यांनी मनोगते व्यक्त केली.

महेश भोसले, दिग्विजय पाटील, अण्णा पाटील, बबलू मोहिते, प्रमोद पाटील, संभाजी कळसे, सागर सावंत, प्रवीण थोरात, शुभम पाटील, उमेश महाजन, भरत पवार, सुरेश माने, आदित्य शिंदे यांनी या मेळाव्याचे नियोजन केले.

 

follow us