Download App

मोठी बातमी! नाराजी दूर…, एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?

Eknath Shinde  : एकनाथ शिंदे उद्या होणाऱ्या शपथविधी सोळ्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे.

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde  : एकनाथ शिंदे उद्या होणाऱ्या शपथविधी सोळ्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याची चर्चा सुरु होती मात्र आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीकडून आज दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आम्ही एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती केली आहे. तसेच त्यांच्या आमदारांची देखील हीच विनंती आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

फडणवीसांना शुभेच्छा देणार पण, पहिल्या सारखं लफड्यात पडायचं नाही; जरांगेंनी सांगून टाकलं…

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु होते. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) जो निर्णय घेणार तो मान्य असल्याचे संगितले होते. त्यानंतर गृह खाते आणि विधानसभा अध्यक्ष पदावर एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता मात्र भाजप गृह खाते आणि विधानसभा अध्यक्षपद सोडायला तयार नसल्याने महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. मात्र आता एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का देत महायुतीने 236 जागा जिंकेल आहे. यामध्ये सर्वाधिक जागा भाजपने जिंकले आहे. भाजपला 131 आणि शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41  जागा मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर यश आले आहे.

follow us