मंत्रिमंडळात राहा, एकनाथ शिंदेंना विनंती केलीयं, मान्य करतीलच; फडणवीसांनी कालच्या भेटीतलं सांगितलं

मंत्रिमंडळात राहा, एकनाथ शिंदेंना विनंती केलीयं, मान्य करतीलच; फडणवीसांनी कालच्या भेटीतलं सांगितलं

Devendra Fadanvis : एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात रहावं, अशी विनंती केली असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची काल वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत फडणवीस आणि शिंदे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमध्ये नक्की काय चर्चा झाली? याबाबत समोर आलं नव्हतं मात्र, आज सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय.

मी पुन्हा आलोय! महाराष्ट्रात पुन्हा ‘देवेंद्र’ पर्व; फडणवीसांची गटनेतेपदी निवड, उद्या ग्रँड शपथविधी

देवेंद्र फडणवीस म्हणाले, काल एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतलीयं. एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केलीयं. शिंदे यांनी मंत्रिमंडळात रहावे, अशी शिवसेना आमदारांचीही इच्छा असून शिंदे आमची विनंती मान्य करतील याची आम्हाला खात्री असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. महायुतीतील सर्वांत मोठा पक्ष हा भाजप ठरलायं. भाजपला 133 जागांवर यश मिळालं असून आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चितच झालं. तर दुसरकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरुन माघार घेतल्याचं समोर आलं. अखेर आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

“आमच्याकडे थर्ड अम्पायर दिला असता तर..” निकालानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे निर्णय घेणार…
राज्यपालांची भेट भेत महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी आज सत्तास्थापनेचा दावा केलायं. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी आम्ही शिफारस केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. तर मंत्रिमंडळाबाबत संध्याकाळपर्यंत मी निर्णय घोषित करणार असल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, उद्या महायुती सरकार राज्यात स्थापन होणार असून मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली असून आता मुख्यमंत्रिपदीही देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार हे शपथविधी घेणार असून एकनाथ शिंदे यांच्याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube