मी पुन्हा आलोय! महाराष्ट्रात पुन्हा ‘देवेंद्र’ पर्व; फडणवीसांची गटनेतेपदी निवड, उद्या ग्रँड शपथविधी
Devendra Fadnavis Elected As The Leader of Maharashtra BJP Legislative Party :
भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर विधिमंडळ गटनेते म्हणून शिक्कामोर्तब झालंय. भाजपच्या कोर कमिटी बैठकीत फडणवीसांचंं नाव फायनल करण्यात आलं (Maharashtra CM) आहे. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल (Vidhansabha Group Leader) झाले होते. विधीमंडळ गटनेत्याचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवर आणि चंद्रकांत पाटील यांनी मांडला. तर, उपस्थित आमदारांनी फडणवीसांच्या नावाला एकमताने अनुमोदन दिले. त्यामुळे आता फडणवीसांचा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचा मार्ग निश्चित झाला असून, उद्या मुंबईतील आझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कोरकमिटी बैठक संपल्यानंतर निर्मला सीतारमन आणि विजय रूपाणी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर सेंट्रल हॉल मध्ये गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करण्यात आली.विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावावर शिक्का मोर्तब झालाय. भाजप कोर कमिटी बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झालेत. परंतु अजून महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव देखील जाहीर झालेलं नाही. आज सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहेत. भाजपच्या गटनेतेपदी कोण असणार? याबाबत देखील अजून स्पष्टता नव्हती. विधीमंडळ गटनेतापदी कोण असणार? याबाबत भाजपची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
Devendra Fadnavis unanimously elected as the Leader of Maharashtra BJP Legislative Party. pic.twitter.com/8jDDMUS2rP
— ANI (@ANI) December 4, 2024
भूकंपाने विदर्भ हादरला! नागपूर, भंडारा, गोदिंयात सौम्य धक्के; तेलंगाणात भूकंपाचे केंद्र
शपथविधी सोहळा पार पडण्याआधी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धातास चर्चा झाली. या बैठकीला गिरीश महाजन देखील उपस्थित आहे. शिंदे फडणविसांमध्ये बंद दाराआड तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचं समोर आलंय. या बैठकीमध्ये खातेवाटप, शपथविधी आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर ही बैठक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचा निर्णय बदलल्याचं समोर आलंय.
हुश्श..! सुनील पाल सुखरुप, बेपत्ता झाल्यानंतर काय घडलं; लवकरच होणार खुलासा
महायुतीत सरकार स्थापनेच्या घडामोडी घडत असताना गृहखात्यावरून रस्सीखेंच सुरू होती. परंतु आता यावर तोडगा निघाल्याचं समोर आलंय. गृहखात्याऐवजी नगरविकास खातं आणि अजून एखादं महत्वाचं खातं एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं जाणार असल्याची माहिती मिळतेय. उद्या महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे. यासाठी अनेक संत महंत, त्याचप्रमाणे इतर राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखील आमंत्रित केलंय. महायुतीचे महत्त्वाचे नेते आज सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची देखील माहिती मिळतेय.