“आमच्याकडे थर्ड अम्पायर दिला असता तर..” निकालानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
Raj Thackeray on Election Results : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्का देणारा ठरला. महायुतीने एक्झिट पोलचे अंदाज धुळीस मिळवत अभूतपूर्व यश मिळवलं. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांच्या पक्षानेही (Ajit Pawar) सरस कामगिरी केली. महाविकास आघाडीची पुरती दाणादाण उडाली.
मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह अन्य काही पक्षांची स्थिती चिंताजनक राहिली आहे. दोन्ही पक्षांच्या जवळपास 96 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत 125 मतदारसंघात उमेदवार दिले होते. यापैकी 119 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. या निकालानंतर सुरुवातीला “अविश्वसनीय.. तूर्तास इतकेच”, असं तीन शब्दांचं ट्विट केलं होतं. आता मात्र त्यांनी निवडणुकीतील पराभवाची मनातील खदखद बोलून दाखवली. क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारक उद्घाटनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारण आणि क्रिकेटची सांगड घालत जोरदार फटकेबाजी केली.
राज ठाकरेंचे इंजिन यार्डातच रुतले, वंचितलाही धक्का; दोघांच्या 96 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
राज ठाकरे म्हणाले, तुमच्याकडे क्रिकेट बदलत गेलं तसं आमच्याकडे राजकारण बदलत गेलं. तुमच्याकडे अम्पायरने आऊट दिल्यावर थर्ड अम्पायर असतो. गेल्या निवडणुकीत आम्हाला थर्ड अम्पायर दिला असता तर निर्णय बदलले असते, वेगळे दिसले असते अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
मनसेच्या 119 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त होण्याच्या बाबतीत मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह अन्य काही पक्षांची स्थिती चिंताजनक राहिली आहे. दोन्ही पक्षांच्या जवळपास 96 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत 125 मतदारसंघात उमेदवार दिले होते. यापैकी 119 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने 200 मतदारसंघांत उमेदवार दिले होते. त्यापैकी 194 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे.
शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या सर्व पक्षांच्या साधारण 1 ते 10 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मनसे, रासप आणि वंचितच्या 95 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने या पक्षांवर मोठी नामुष्की ओढवली आहे.
Raj Thackeray : टोल आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर, त्यांना मुंबईचं उदाहरण द्या!