Download App

फडणवीसांनी घेतली मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांची भेट, नेमकं कारण काय?

Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार पडण्याचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी नगरमध्ये (Sambhaji Nagar) विनोद पाटलांची (Vinod Patil) भेट घेतली मात्र ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विनोद पाटलांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनोद पाटील हे आमचे मित्र आहे. मराठा समाजाला आरक्षण द्याचा होता तेव्हा विनोद पाटलांची विशेष मदत झाली. मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं, कसं टिकवायचं याबाबत त्यांची मदत झाली. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका असताना विनोद पाटील यांनी मदत केली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच ही राजकीय भेट नाही तर कौटुंबिक भेट आहे. असं देखील फडणवीस म्हणाले. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे सर्व उमेदवार पाडू असा इशारा दिला आहे.

पक्ष फोडणारे दोन तीन लोक, पराभव करा, शरद पवारांचा परळीत रोख कुणाकडे?

यावर प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी भूमिका मांडल्यावर आमची भूमिका मांडू. आम्ही आपलं काम करत आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. आरक्षण दिलं आणि टिकवलं. असं देखील माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

follow us