Sambhajirao Patil Nilangekar : शेतकरी व शेतमजुरांचे हित डोळ्यासमोर ठेवत धोरणे आखण्याचे काम माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांनी केले. त्यामुळेच मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे (Govindrao Chilkure) यांनी केले. या विधानसभा निवडणुकीत शेतकरी, शेतमजुरांच्या संकटकाळी धावून जाणारे व त्यांना अडचणीच्या काळात सर्वतोपरी मदत करणारे, शेतकऱ्याला आपला जीव की प्राण समजणारे माजी पालकमंत्री आ.निलंगेकर यांच्या पाठीशी तमाम शेतकरी बांधवांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे,असे आवाहनही त्यांनी केले.
चिलकुरे म्हणाले की,आ. निलंगेकर हे मागच्या 12 वर्षापासून या भागाचे नेतृत्व करत आहेत. शेतकऱ्यांच्या सोबत, त्यांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभा राहत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले.या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात होती. 12 वर्ष बंद पडलेला अंबुलगा कारखाना त्यांनी चालू केला. कारखानदारीत स्पर्धा निर्माण केली.या भागातील शेतकऱ्यांचा ऊस 15 ते 16 महिने झाल्याशिवाय जात नव्हता. कारखाना देईल तेवढ्या पैशावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत होते. परंतु अंबुलगा कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणण्याचे काम त्यांनी केले असल्याचे चिलकुरे म्हणाले.
मराठवाड्यात सर्वाधिक भाव देणारा अंबुलगा कारखाना ठरला आहे.त्यांनी पहिली उचल एकरकमी 2700 रुपये दिल्यामुळे इतर कारखानदारांना त्या तुलनेत पैसे द्यावे लागले. त्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशात अधिकचे पैसे येऊ लागले. 11 महिन्याच्या आत ऊस फडाच्या बाहेर गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या टनेजमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. उसाबरोबरच ज्यावेळी सोयाबीनसाचे भाव तेंव्हा पडले फरकाची रक्कम हेक्टरी 5 हजार देण्यासाठी भूमिका मांडली व मुख्यमंत्र्यांनी पैसे देण्याचे मान्य केले.शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली.
या भागात सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे परंतु प्रती हेक्टरी सोयाबीनची उत्पादकता खूपच कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदारसंघात शेतकरी समृद्ध अभियान राबवले. या अभियानात विविध तज्ञ व्यक्तींना बोलावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. उत्पादन वाढीसाठी टोकन पद्धत, बीबीएफ पद्धत वेगवेगळे तंत्रज्ञान,अधिक उत्पादन देणाऱ्या सोयाबीनचे वाण असे अनेक प्रयोग केल्यामुळे प्रति हेक्टरी सोयाबीनचे उत्पादन वाढण्यास मदत झाली.
आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वात मला लातूर जिल्हा परिषदेमध्ये कृषी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली.तो काळ कोरोनाचा होता.महाराष्ट्रात आमचे सरकार नव्हते.आ. संभाजीराव पाटील यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा परिषदेमध्ये आम्ही काम केले. कृषी समितीच्या बैठका शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतल्या.योग्य व गरजू शेतकऱ्यांना लाभ देण्याचे काम केले.
शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन समितीच्या बैठका घेणारी लातूर जिल्हा परिषद महाराष्ट्रात एकमेव ठरली.लंपी सारखा महाभयंकर आजार जनावरांना झाल्याने पशुपालक संकटात सापडले.त्यांच्यासाठी लस व औषध उपलब्ध नव्हते.आम्ही जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून लस व औषध उपलब्ध केले. शेतकऱ्यांच्या जनावरांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याचे भाग्य आम्हाला लाभले. शेतकऱ्याप्रती संवेदनशीलता व सहानुभूती असलेल्या माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामुळे हे शक्य झाले.
शेतकरी,शेतमजूर बांधव,सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी,शेतमजूर,महिला,युवक या प्रत्येकासाठी घरातील सदस्य म्हणून काम करणारे नेतृत्व आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे आहेत. या भागातील शेतकरी, महिला व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून काम केले.आ. निलंगेकर विरोधी पक्षात असताना या भागात अतिवृष्टीमुळे उभे पीक वाहून गेले.त्यावेळी लातूरला 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन त्यांनी केले.अन्नदात्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.शासनाला तात्काळ विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावी लागली. त्याचबरोबर या भागात शाश्वत आणि जिवंत पाणी आणण्यासाठी जिल्ह्यात ऊन पाऊस न पाहता मोटरसायकलीवर जलसाक्षरता रॅली काढली.शासनाच्या लक्षात आणून दिले की या भागातील शेतकऱ्यांसाठी,पिण्याच्या पाण्यासाठी उद्योगधंद्यासाठी पाणी किती आवश्यक आहे.
राहुल कलाटेंचे सोसायट्यांना टँकरमुक्त करण्याचे आश्वासन, चिंचवडमध्ये भेटीगाठी व बैठका
कृष्णा खोऱ्यातील पाणी मांजरा,तेरणा व तावरजा या नदीपात्रात आणून सोडले तर शेती व पिण्याच्या पाण्यासाठी माय माऊलीला भटकंती करावी लागणार नाही यासाठी ते प्रयत्नशील आहेत.या भागाला पाणीदार बनविण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. खंबीर नेत्यामुळे या भागाचा ते विकास होत आहे.त्यांच्या पाठीशी तमाम शेतकरी बांधवांनी रहावे व आपला मतदानरुपी आशिर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे,असे आवाहनही गोविंदराव चिलकुरे यांनी केले आहे.