Mahayuti Cabinet Formula : विधानसभा निवडणुकीचे निकाल महायुतीच्या (Mahayuti) बाजूने लागला असून येत्या काही दिवसात राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला मंत्रिमंडळात किती मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार महायुतीमध्ये 20-12-10 असा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपला 20, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे अर्थ, गृह आणि ग्रामविकास खाता कोणत्या पक्षाकडे जाणार? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नसल्याची देखील माहिती समोर येत आहे. तसेच त्यांच्या जागी श्रीकांत शिंदे किंवा गुलाबराव पाटील यांना उपमुख्यमंत्री पदासाठी संधी मिळू शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरून आपला दावा सोडला असला तरीही शिंदे शिवसेनेला महत्तवाची खाती मिळावी यासाठी आग्रही आहे. माहितीनुसार, एकनाथ शिंदे शिवसेनेला गृहमंत्रिपद मिळावे यासाठी आग्रही आहे. भाजप गृहमंत्री पद सोडायला तयार नाही. त्यामुळे सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात गृहमंत्री पदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
शिवसेनेतून उपमुख्यमंत्रीपद कोणाला? श्रीकांत शिंदे यांच्यासह ‘या’ 5 नावांची चर्चा
तसेच पुन्हा एकदा अर्थ खाते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने तीन राज्यमंत्रिपदांची देखील मागणी भाजपकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे.