Gopichand Padalkar On Jayant Patil : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. त्यावरून आता महाविकास आघाडीकडून इव्हीएमवर (EVM) शंका उपस्थित केला जात आहेत. त्याविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलने केले जाणार आहे. त्याविरोधात भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabahu Khot) यांनी इव्हीएमच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन केले आहे. महाविकास आघाडीकडून इव्हीएमवर शंका घेतल्या जात असल्याबाबत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी लेट्सअपने संवाद साधला.
निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर, बाबा आढाव यांचा आरोप, ईव्हीएम बाबतही शंका…
इव्हीएमबाबत उपस्थित केल्या जात असलेल्या शंकाबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले, भारत हा लोकशाही मजबूत करणारा देश आहे. लोकशाही निवडणूक प्रक्रिया आहे. देशात सातत्याने निवडणुका होत असतात. कधी लोकसभेची, कधी विधानसभेची, कधी जिल्हा परिषद, कधी पंचायत समिती, ग्रामपचंयाती निवडणूक होत आहे. लोकसभेची निवडणूक एप्रिल मे मध्ये झाली. तेव्हा महाविकास आघाडीला यश आले आहे. महायुतीला सतरा खासदार निवडून आले. तेव्हा हे काही बोलले नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार आली. तेलंगणामध्ये निवडून आले आहे. तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षाची सत्ता आली. तेव्हा ते इव्हीएमवर बोलले नाहीत. पण गेल्या-तीन दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून बघतो. ते सातत्याने इव्हीएम घोटाळा असे म्हणत आहेत. त्यामुळे मी आणि सदाभाऊ यांनी ठरविले आहे. आम्ही या विषयावर चर्चा करून भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, असे ठरविले आहे. आम्ही भूमिकाही कागदपत्री घेतली आहे. सायंकाळी सहानंतर मताची टक्केवारी का वाढली, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे म्हणत आहे. सहानंतर मतदान झाले आहे, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. आता तुम्ही चुकीच्या पद्धतीने सांगत आहेत. तुम्हाला बुध्दी नाही. लाडक्या बहिणी, शेतकरी, ओबीसी आहेत. अंगणवाडी सेविका असतील. शिक्षणसेवक आहे. कंत्राटीसेवक, होमगार्ड आहे. सगळ्या लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद दिला आहे.
1500 रुपये ‘लाडक्या बहिणी’ला अन् अख्खी तिजोरी भावाला; सुषमा अंधारेंनी टाकली नवी गुगली
जजयंत पाटील यांनी एका बैठकीत सांगितले की भाजपने 50 हजार मतांचे सेटिंग केले आहे. जयंत पाटील यांचा चांगला शिकलेला माणूस, विदेशात शिकलेला माणूस आहे. ते जर असं म्हणतं असतील 50 हजार मते वजा केली आहे. आमचे आव्हान आहे की कसे पन्नास हजार मते वजा केले. ते डेमो करून दाखवा. तुम्ही मुंबईला या. आम्हाला बोलवा, पत्रकारांना बोलवा. इव्हीएम सेट करून दाखवा, पन्नास हजार मतदान कमी कसं होतं तो. महाराष्ट्रात तुमचेही आमदार निवडून आले आहेत. त्यांनाही सहानंतर मतदान झाले आहे ना.
कोणताही हॅकर आणा
महाष्ट्रात काय झालंय, खोटं बोलत गेलं की लोकांना खरं वाटतं. हे लोक इव्हीएम मशीनला बदनाम करत आहेत. महायुतीचा मोठा विजय झाला आहे. हा विजय बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीचा जनतेने पराभव केला आहे. त्याचे खापर ते इव्हीएमवर फोडत आहेत. आम्ही त्यांना चॅलेंज केले आहे. तुम्ही कोणताही हॅकर आणा. इव्हीएम हॅक होते ते सिध्द करा. आम्ही तुम्हाला अकरा लाख रुपयांचे बक्षीस देतो, असे आम्ही जाहीर केले आहे, असे आव्हानही गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.