Download App

“बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोन पे करा”; आमदार बांगरांच्या वक्तव्याने खळबळ!

मतदारसंघातील बाहेर जिल्ह्यात गेलेल्या मतदारांना परत आणण्यासाठी फोन पे करा असं वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे

Hingoli News : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू (Maharashtra Elections 2024) झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप सुरू आहे. दुसरीकडे इच्छुकही आपापल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी ठरवत आहेत. यातच आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांचं एक वक्तव्य प्रचंड व्हायरल होत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मतदारसंघातील बाहेर जिल्ह्यात गेलेल्या मतदारांना परत आणण्यासाठी फोन पे करा असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आईवडील मला मतदान करणार नसतील तर दोन दिवस जेवू नका; संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

हिंगोलीतील कळमनुरी (Hingoli News) मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी शहरातील तोष्णीवाल मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले. निवडणूक आचारसंहितेच्या काळात त्यांनी असे वक्तव्य केल्याने त्याची चर्चा होत आहे. संतोष बांगर म्हणाले, माझा उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठं शक्तिप्रदर्शन करावं. मिळेल तितक्या गाड्या आणाव्यात. मतदारसंघाबाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांची यादी बनवा. कार्यकर्त्यांसाठी ज्या गाड्या असतील त्या गाड्यांसाठी जे पैसे लागतील ते फोन पे करा. त्यांना सांगा जाण्यायेण्याची काळजी असेल त्याचीही व्यवस्था करू.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याबरोबरच कार्यकर्त्यांना प्रलोभन देण्याची भाषा केल्याने आमदार संतोष बांगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मतदारांना अमिष दाखवण्याचाच हा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून काही कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वायकरांसह अन्य दोन नेते ‘या’ दिवशी शिवसेनेत प्रवेश करणार; संतोष बांगरांचा गौप्यस्फोट

 

 

follow us