‘आम्हाला चोर म्हणतो हा तर डाकू’, Santosh Bangar राऊतांवर बरसले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 01T140429.970

मुंबई :  शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर ( Santosh Bangar ) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊत हे आम्हाला चोर म्हणतात पण ते स्वत: डाकू आहेत, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने त्यांच्याविरोधात भाजप व शिवसेनेचे आमदार आक्रमक  झाले आहेत.

शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत राऊतांवर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत हे आमच्या मतावर निवडूण आलेले आहेत व आम्हालाच चोर म्हणत आहेत. मी म्हणतो संजय राऊत हा डाकू आहे. त्यांच्यावर 395 चा गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणाले आहेत.

(Shahajibapu Patil : संजय राऊत हे कुणाचे हस्तक ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती)

तसेच राऊत हे आम्हाला चोर म्हणाले आहेत. त्याच पद्धतीने राऊतांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना देखील चोर म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना बाहेर फिरु देणार नाही, अशी टीका बांगरांनी केली. याआधी शिंदे गटाच्या आमदारांनी विधानभवनात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी राऊतांवर कारवाई करावी म्हणून शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत.

त्यामुळे विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे कामकाज आजच्या दिवसापुरते स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान भाजप आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी राऊतांवर हक्कभंग आणावी अशी मागणी केली आहे.

Tags

follow us