वायकरांसह अन्य दोन नेते ‘या’ दिवशी शिवसेनेत प्रवेश करणार; संतोष बांगरांचा गौप्यस्फोट

  • Written By: Published:
वायकरांसह अन्य दोन नेते ‘या’ दिवशी शिवसेनेत प्रवेश करणार; संतोष बांगरांचा गौप्यस्फोट

Santosh Bangar : ठाकरे गटाला णखी एक धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर आता आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी भाष्य केलं. येत्या आठ दिवसांत ठाकरे गटातील काही नेते शिवसेनेत येणार असल्याचा खुलासा आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ यांचा नेमका गुन्हा काय? सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज 

देशात काही दिवसांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांचे नेते सत्ताधारी पक्षात सामील होत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा होती, तर आता आता आणखी काही बडे नेते प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आमदार संतोष बांगर म्हणाले, रवींद्र वायकर हे आमच्या शिवसेनेत तर येणारच आहेत. त्यांच्यासोबत मराठवाड्यातील एक खासदार आणि कोकणातील एक आमदार प्रवेश करणार आहे, असाा गौप्यस्फोट बांगर यांनी केला.

मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचा लाभ कोणाला अन् किती मिळणार? 

बांगर म्हणाले, आठ ते दहा दिवसांत हे नेते प्रवेश करणार आहेत. आणखी काही नेते आमच्या संपर्कात आहेत. सभागृहात आमच्याशी बोलत असताना बाकीचे आमदार सांगतात आम्ही तुमच्यासोबत शिंदे साहेबांसोबत गेलो असता तर बरं झालं असतं, असं बांगर म्हणाले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम चांगले सुरू आहे. त्यामुळे आता अनेक नेते आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, असेही बांगर म्हणाले

पुढं बोलतांना बांगर म्हणाले, रवींद्र वायकर हे खूप चांगले नेते आहेत. त्यांनी आमच्याकडे संपर्क प्रमुख म्हणून काम केले आहे. आमच्या पक्षात येण्याशी ईडी, सीबीआयचा काहीही संबंध नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहून ते आमच्या पक्षात येणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर चार दिवसांत ते पक्षात प्रवेश करणार असल्याचेही आमदार बांगर यांनी सांगितले.

वायकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवसाच्या दिवशी शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर अलीकडचे मुंबई महापालिकेनं अवघ्या दोन महिन्यात घूमजाव करत वेगळी भूमिका घेतली. त्यामुळं वायकरांच्यचा पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या. अशातच आमदार बांगर यांनी वायकर यांच्यासोबत अन्य दोन बडे नेते शिंदे गटात दाखल होणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं ते दोन नेते कोण, याचीच चर्चा रंगली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube