राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या सभांमुळे ध्वनी प्रदूषण, सदावर्ते म्हणाले मी कोर्टात…
. तुमच्या सभांमुळे voice polution होत असल्याचं आम्ही तक्रार केली आहे असंही सदावर्ते म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी मुंबईचा एक मतदार आहे. त्यामुळेच मी बोलत आहे. (Election) कायदाबाह्य वर्तन करणारे दुसऱ्याला कायदा शिकवत आहेत. 11 जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) संयुक्त सभा होणार आहे. दरम्यान, उद्याच्या मुंबईतील सभेविरोधात गुणरत्न सदावर्ते म्हणलाे आपण कोर्टात जाणार आहोत.
राज ठाकरेंना पर्यावरणाचा पुळका असल्याचं दिसते, एक बोट दुसरीकडं दाखवता मात्र ४ बोट आपल्याकडं असतात असा टोला त्यांनी लगावला आहे. तुमच्या सभांमुळे voice polution होत असल्याचं आम्ही तक्रार केली आहे असंही सदावर्ते म्हणाले. उच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार तिथे राजकीय पक्षांना हक्काने सभा घेण्याचा अधिकार देण्यात आला नाही, त्या सभेच्या विरोधात आम्ही तक्रार केली आहे, ध्वनी प्रदूषण बाबत तक्रार आहे, हे कोर्टाचे अवमान करत आहेत असंही ते म्हणाले.
माझं म्हणणे आहे कायद्याचे पालन झाल पाहिजे, मग ठाकरे बंधू असो वा इतर राजकीय पक्ष असो. आता गुन्हा दाखल केला असून त्यांना काय म्हणायचं आहेत ते कोर्टात सांगतील असंही सदावर्ते म्हणाले. क्रीडा महोत्सव, ६ डिसेंबर असो चालेल जेसी करनी वैसी भरणी असंही सदावर्ते म्हणाले. राज ठाकरे अपने गिरबन झाक कर देखो, हा संघ भारत आहे.
अन्नमलाई साहेबांनी बरोबर सांगितलं आहे, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे
दुनियाच मोठे सेंटर आहे, त्यामुळे तिला तुकड्यात पाहता येत नाही. ते कायदा सुव्यवस्था पाहतात असं म्हणत राज ठाकरे बाहेरील लोकांना विरोध करतात त्यावरही सदावर्ते बोलले. त्याचवेळई लवकरच धनंजय मुंडे मंत्री झाले पाहिजेत, ही सर्व बहुजन समाजाची इच्छा आहे असंही ते म्हणाले.
कधी होणार सभा?
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण, ठाकरे बंधू हे पहिल्यांदाच एकत्र येऊन सभा घेणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे या सेभेकडे लक्ष लागले आहे. या सभेमध्ये ठाकरे बंधू काय संदेश देणार आणि काय भूमिका मांडणार याकडे हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आतुर आहे. 11 जानेवारीला ही सभा संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.
