राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचा धमाका; भाजप स्वबळावर लढणार?, अमित शहांचे संकेत

राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचा धमाका; भाजप स्वबळावर लढणार?, अमित शहांचे संकेत

Maharashtra Elections : येत्या चार महिन्यांत महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या ताकदीची चाचपणी सुरु झाली आहे. त्याअनुषंगानं भाजपचा अजेंडा समोर आला आहे. (Elections) मुंबई, ठाणे आणि पुणे या महत्वाच्या शहरांच्या आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबाबतचे संकेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते अमित शहा यांनी दिले आहेत, अशी सुत्रांची माहिती आहे.

काल मुंबई दौऱ्यावर आलेले असताना शहांनी हे विधान केल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. यावेळी महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही चर्चा झाली. तसंच राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळी बैठकीत त्यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा, अशा सूचना महायुतीतील नेत्यांना दिल्याचं सुत्रांकडून मिळालेल्या माहितीतून समोर आलं आहे.

दबाव टाकून, धमकावून हे प्रकरण दाबलं; मंत्री शिरसाटांच्या मुलाच्या प्रकरणात दमानियांचा आरोप

यामध्ये मुंबई महापालिकेत भाजपची ताकद चांगली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला तोडीस तोड नगरसेवक निवडून आणले होते. भाजपची अशीच स्थिती पुणे महापालिकेतही आहे. या ठिकाणी १०० हून अधिक नगरसेवक भाजपनं निवडून आणले होते. पुण्यात राष्ट्रवादीची ताकदही पहिल्यापासून चांगलीच आहे. तर ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही याची झलकं दिसून आली होती.

त्यामुळं अमित शहांनी या मित्रपक्षांशी चर्चा करताना एकत्र निवडणूक लढताना जागा वाटपांचं गणित कसं असेल? त्याचबरोबर जर महायुतीतील मित्रपक्षांना स्वबळावर लढायचं असेल तर ते शक्य होईल का? याबाबतची चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं भाजप स्वतःहून स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याबाबत उत्सुक असल्याचीही आता चर्चा सुरु झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube