Download App

अंकगणित नाही; 44 उमेदवार जाहीर केल्यानंतर आग्रहाखातर पाटलांनी जाहीर केला शेजारी बसलेला उमेदवार

Jayant Patil On Prashant Jagtap : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, मनसे, शिवसेना(शिंदे गट) , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेनेनंतर

  • Written By: Last Updated:

Jayant Patil On Prashant Jagtap : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, मनसे, शिवसेना(शिंदे गट) , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेनेनंतर (ठाकरे गट) आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारकडून (NCP Sharad Chandra Pawar) देखील आपली पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेत 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर पुन्हा एकदा कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार (Rohit Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर इस्लामपूरमधून जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी 45 वा उमेदवार जाहीर करताच पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणारे कार्यकर्त्यांनी प्रचंड टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून 45 वा उमेदवार म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी प्रचंड टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला.

त्यांची उमेदवारी जाहीर करताना जयंत पाटील म्हणाले की, मी आतापर्यंत 44 उमेदवार जाहीर केले आहे. 45 वा उमेदवार जाहीर करण्यात काही विशेष अंकगणित नाही मात्र मी मुंबईमध्ये जाणून पुण्यातील उमेदवारांची घोषणा करणार होतो मात्र तुमच्या आग्रहाखातर मी उमेदवारी जाहीर करत आहे असं म्हणत त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आहे.  त्यांची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी प्रचंड टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना धनसावंगी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

इच्छुक म्हणून येणार अन् गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी, स्क्रिनशॉट व्हायरल

तर कराड-उत्तरमधून बाळासाहेब पाटील, मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड, कोरेगावमधून शशिकांत शिंदे, बसमतमधून जयप्रकाश दांडेगावकर, जळगाव-ग्रामीणमधून गुलाबराव देवकर, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे, शिरुरमधून अशोक पवार, शिराळामधून मानसिंगराव नाईक, विक्रमगडमधून सुनिल भुसारा, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, अहमदपूरमधून विनायक पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

follow us