प्रशांत गोडसे, प्रतिनिधी मुंबई
Kalwa Mumbra Constituency : महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 29 ऑक्टॉबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज आणि उद्या सर्वच उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करत असल्याचा पाहायला मिळत आहे. त्यातच ठाण्यातील कळवा मुंब्रा मतदारसंघातील (Kalwa Mumbra Constituency) लढतीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे कारण की या मतदारसंघात गुरू शिष्याची लढाई पाहायला मिळणार आहे.
कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात नेमकी बाजी कोण? मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला
ठाणे महानगर पालिका हद्दीत येणारा मात्र ठाणे लोकसभा मतदार संघात समावेश नसणारा मतदार संघ म्हणजेच कळवा-मुंब्रा मतदारसंघ होय. 2009 पूर्वी मतदार संघाची पुनर्रचना होण्यापूर्वी कळवा-मुंब्रा मतदारसंघ बेलापूर मतदारसंघात होता. तत्कालीन मतदार संघावर गणेश नाईक यांचे प्रभुत्व पाहायला मिळाले. 2009 साली मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर कळवा-मुंब्रा मतदार संघ तेंव्हापासून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे. कळवा-मुंब्रा मतदार संघ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बनला आहे.मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट झाल्याने हा मतदार संघ शरद पवार (Sharad Pawar) की अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडे जातो हे पाहावे लागेल.
फरक पडणार नाही – जितेंद्र आव्हाड
मुब्रा कळवा विधानसभा मतदार संघातून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) सलग तीन टर्म विजयी राहिले आहे. गेल्या निवडणूकित त्यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे आता मात्र परिस्थिती बदली असून एकेकाळी कट्टर समर्थक, सहकारी असलेला नजीब मुल्ला यांच्याशी थेट लढत कळवा मुंब्रा मतदारसंघात होणार आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की आमच्यात गुरु शिष्याचे नातं होतं. आता निवडणूक आहे कोण कोणासमोर उभे राहू शकतो.त्यामुळे यावेळी कोणीही उभे राहिले तर आपल्याला फरक पडत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गुरु शिष्यला संपवायला लागला तर शिष्य सोबत कसा राहणार – नजीम मुल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र वाडी यांचे एकेकाळाचे खंदे समर्थक असलेले नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली असून मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी असा संघर्ष रंगणार आहे. गुरु शिष्याला संपवायला निघाला तर शिष्य गुरू सोबत कसा राहील असा सवाल नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला आहे तसेच गुरु शिष्य चा नातं दोन्ही बाजूने जपलं पाहिजे होतं असं देखील नजीम मुल्ला यांनी म्हटलं आहे.
कसा बनलाय मतदार संघ
संपूर्ण कळवा पश्चिम, रेतीबंदर, पारसिक नगर, खारीगाव, पूर्वेकडील विटावा, सूर्या नगर, मुंब्रा, कौसा सर्व भागाचा समावेश या मतदार संघात येतो.विधानसभा मतदार संघात मुंब्रा भाग मुस्लिमबहुल आहे तर कळवा परिसरात मराठी आणि आगरी मतदारांचे प्रमाण जास्त आहे.
राज्याला लवकरच एक उमदा नेता मिळणार…राहुरीत तनपुरेंनी फोडला प्रचाराचा नारळ ; भाच्यासाठी मामा मैदानात
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उतार चढाव गेल्या पाच वर्षात पाहायला मिळाले. पक्ष फुटीचे राजकारण देखील राज्यातील जनतेने पहिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी करून अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात तिकिटासाठी उड्या मारतांना देखील पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे राज्यातील लढती पैकी एक लढत असलेली मुब्रा कळवा मतदार संघातील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढतीत मतदार संघातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.