Download App

आशुतोष काळेंना मंत्री करण्यासाठी मोठे मताधिक्य द्या, अभिनेते भाऊ कदमांचे आवाहन…

आशुतोष काळेंना मंत्री करण्यासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले.

  • Written By: Last Updated:

कोळपेवाडी : महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर घेवून जाण्याची ताकद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे (Ajit Pawar) असून त्यांचा हाथ आ. आशुतोष काळेंच्या (Ashutosh Kale) पाठीवर आहे. हे आशुतोष काळेंनी केलेल्या कामावरून दिसून येते. त्यामुळे ते आमदार तर होणारच आहे. परंतू ते मंत्रीही झाले पाहिजे यासाठी आशुतोष काळेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) स्टार प्रचारक व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कद (Bhau Kadam) यांनी केले.

आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेते भाऊ कदम आज पुणतांब्यात; भव्य रॅलीचं आयोजन 

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ पुणतांबा येथे आ. काळेंच्या समवेत अभिनेते भाऊ कदम यांनी प्रचार रॅली काढली. जुने रेल्वे गेट पासून प्रचार रॅलीस प्रारंभ झाला. यानंतर आयोजित सभेत नागरिकांशी संवाद साधतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर काशी संबोधल्या जाणाऱ्या पुणतांबा नगरीच्या तीर्थक्षेत्रामध्ये मी जेव्हा आलो, तेव्हा मला जाणवले की या ठिकाणी पुरेपूर विकास झालेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या विकासाचे व्हिजन असून त्यांची ताकद वाढवायची आहे आणि आ.काळे यांना देखील मंत्री करायचे आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघाच्या सुजाण मतदारांनी विकासाच्या बाजूने उभे राहून आ.आशुतोष काळे यांना मोठे मताधिक्य द्यावे, असं आवाहन भाऊ कदम यांनी केलं.

आशुतोष काळेंना विजयी करा, मोठी जबाबदारी देतो; अजित पवारांनी नेमकं काय सांगितलं? 

यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघातील इतर गावांप्रमाणे राहाता तालुक्यातील अकरा गावांना देखील समान न्याय दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे. या भागाचा अद्यापही संपूर्ण विकास झालेला नाही. पहिले दोन वर्ष कोरोना महामारीमुळे निधी मिळण्यात काहीसा विलंब झाला असला तरी त्यानंतर ती कसर भरून काढली. या अकरा गावातील रस्ते, पाणी, वीज व तीर्थक्षेत्र विकासाला कोपरगाव तालुक्यातील गावांच्या बरोबरीत निधी दिला आहे.

पुढं ते म्हणाले, यामध्ये प्रामुख्याने वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा (एमडीआर- ८७) मजबुतीकरण करणे, गणेशनगर वाकडी रस्ता, वाकडी येथील श्री खंडोबा महाराज देवस्थान विकास, जळगाव-पुणतांबा-राहता-चितळी रोड, शिंगवे-वारी रस्ता, रामपूरवाडी- पुणतांबा रस्ता-नपावाडी-पुणतांबा रस्ता चांगदेव महाराज समाधी परिसर सभामंडप व स्वच्छतागृह, वाकडी येलमवाडी-पुणतांबा (ग्रामा ६३), पुणतांबा रेल्वे गेट ते चांगदेव महाराज समाधी मंदिर, पुणतांबा केटी वेअर दुरुस्ती आदी कामांचा समावेश असून यापुढील काळात उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

यावेळी गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, ज्येष्ठ नेते अॅड. मुरलीधर थोरात, शिवसेना (शिंदे गट) शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, माजी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, राजेद्र धनवटे, सौ.संगीता भोरकडे, आण्णासाहेब कोते, गणेश थोरमोटे, बाळासाहेब चव्हाण, श्याम माळी, श्रीमती अॅड.संध्या थोरात, साहेबराव आदमाने, सुनील म्हसे, सुनील सांबारे, शाम जगताप, नितीन जगताप, अर्जुन बोंबले, चंद्रकांत वाटेकर, गणेश बनकर, सर्जेराव जाधव, राहुल धनवटे, विजय धनवटे, बाळासाहेब बाबुळखे, पद्माकर सुरडकर, भाऊसाहेब जाधव, दीपक वाघ, नितीन वाघचौरे, सोपानराव वाघ, सोनाजी पगारे, रघुनाथ वाघ, रुपेश गायकवाड, बाबासाहेब उगले, सुनील कोते, भाऊसाहेब लहारे, रामकृष्ण चव्हाण, सुनील थोरात, बबलू पऱ्हे, शाम धनवटे, विलास पेटकर, शिवसेनेचे चंद्रकांत वाटेकर, ग्रामपंचायत सदस्य श्याम धनवटे, भूषण वाघ, संगीता भोरकडे, सर्जेराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

follow us