महाविकास आघाडीतील जागा वाटपासाठी मुंबईत आणखी एक बैठक; यादी कधी जाहीर होणार ?

25 ऑक्टोबरला काँग्रेस निवडणूक समितीची पुन्हा एक बैठक होईल. त्यानंतर जागा वाटपाची माहिती जाहीर केली जाणार आहे.

महाविकास आघाडीतील जागा वाटपासाठी मुंबईत आणखी एक बैठक; यादी कधी जाहीर होणार ?

Congress Meeting

Maha Vikas Aghadi Seat Sharing: विधानसभा निवडणुकीसाठी (Mahrashtra Assembly Election) महायुतीच्या जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर करून जागा वाटपात आघाडी घेतली आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले आहे. त्यामुळे महायुतीचे तिन्ही पक्षांच्या याद्या कधीही जाहीर होऊ शकतात. पण महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) एकही यादी जाहीर झालेली नाही. आज दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीची बैठक झाली. त्यात 66 जागांबाबत चर्चा झाली आहे.


…तर लाडक्या बहिणींना दोन हजार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीत काँग्रेस (Congress) निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी जागा वाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाला,उद्या मुंबईत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची बैठक होईल. या बैठकीत जागा वाटपांबाबत चर्चा होईल. त्यानंतर 25 ऑक्टोबरला काँग्रेस निवडणूक समितीची पुन्हा एक बैठक होईल. त्यानंतर जागा वाटपाची माहिती जाहीर केली जाणार आहे. आजच्या बैठकीत 66 जागांवर चर्चा झाली आहे. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह इतर उपस्थित होते.

संदीप नाईक तुतारी होती घेणार का? वडील गणेश नाईक म्हणाले, ‘त्यांना निर्णय घेण्याचं…’

महाआघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद झाला होता. त्यात नाना पटोले आणि ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला होता. नाना पटोले यांच्याशी चर्चा करणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले होते. त्यानंतर चेन्निथला हे मुंबईत आले होते. त्यांनी उद्धव ठाकरे व इतर नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर जागा वाटपाबाबत पुढे चर्चा सुरू झाली आहे.

विदर्भ, मुंबईतील जागांवरून रस्सीखेच
विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून महाविकास आघाडीच्या जागा वाटप रखडले होते. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या भागातील जागांवरून रस्सीखेच आहे. विदर्भातील सर्वाधिक जागा या काँग्रेसला हव्या आहेत. त्यावर नाना पटोले हे अडून बसलेले आहेत. त्यामुळे ठाकरे गट व पटोले यांच्यामध्ये वाद झालेला आहे. तर महाविकास आघाडीमध्ये सात ते आठ जागांवरूनच तिढा असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी स्पष्ट बोलताना सांगितले आहे.

Exit mobile version