Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे. सध्या संपूर्ण राज्यात प्रचार सभा आणि गाठीभेटींचा धडाका सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.
तर दुसरीकडे निवडणूक आयोग (Election Commission) देखील मतदानाचा टक्का वाढवण्याची मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत आता राज्य सरकारकडून परिपत्रक देखील जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारने या परिपत्रकात म्हटले आहे की, क्रमांक सार्वसु-1024/126 (29) लेखअधिनियम, 1889 (1889 चा 26) च्या कलम 25 नुसार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक 31/1/38 जेयुडीएल तीन दिनांक 8 मे 1968 अन्यये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघानिक सुट्टी करीत आहे, असे परिपत्रकच राज्य शासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी. तसेच केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्याचे सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. तसेच याबाबत राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभाग यांनी सदर अधिसूचना काढून प्रसिद्ध करावी असे आदेशही महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दिले आहेत.
कलाटेंसाठी शरद पवार चिंचवडमध्ये, ‘वस्ताद’ काय करणार याकडे सर्वांचे लक्ष?
तर दुसरीकडे यापूर्वी मुंबईमध्ये देखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबई आयुक्तांनी (Mumbai Commissioner) मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यामधील सर्व मतदारांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सुट्टी जाहीर केली आहे.