Download App

माझ्या पराभवाचा वचपा यावेळी काढा; आढळरावांनी शेवटच्या क्षणी वळसे पाटलांसाठी डाव टाकला…

जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे हे गाव कोल्हेंनी दत्तक घेतले होते. मात्र, त्यागावात तो खासदार फिरकलाच नसल्याचे आढळराव म्हणाले.

  • Written By: Last Updated:

मंचर : लोकसभा निवडणुकीत जी चूक केली ती आता करू नका. दुर्देवाने विधानसभेलाही ती चुकी केली तर, तालुक्याचे मोठे नुकसान होऊन तालुक्याला वालीच राहणार नाही. त्यामुळे लोकसभेतील माझ्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत काढून दिलीप वळसे पाटलांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे. ते पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे कोपरा सभेत बोलत होते.

आंबेगावला गतवैभवाकडे नेण्यासाठी वळसे पाटलांचा विजय महत्त्वाचा; लेकीची बापासाठी भावनिक साद

आढळराव पाटील म्हणाले की, समोरच्या उमेदवाराचे साथीदार आमदार रोहित पवार खासदार निलेश लंके हे डिंभे धरणाला बोगदा पाडून ते पाणी कर्जत जामखेडला नेणार असल्याच्या मोठ्या आवाजात गमजा करतात. यावर विरोधी उमेदवार बोलायला तयार नाही. केवळ निंदा नालस्ती करत आहे. त्यांनी स्वभिमान, निष्ठा, गद्दारी या गोष्टी बोलूच नये. विकासावर देखील बोलावे असे म्हणत लाव रे तो व्हिडिओ म्हणत मतदारांची करमणूक थांबवावी, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

देवदत्त निकम म्हणजे आंबेगावातून उभं केलेलं बुजगावण; शरद सहकारी बँकेच्या अध्यक्षांची बोचरी टीका

तो फिरकलाच नाही

घरातला खासदार सोडून बाहेरच्या खासदाराला निवडणे, ही चूकच झाली. विधानसभेला ही चूक करून नका. जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे हे गाव कोल्हेंनी दत्तक घेतले होते. मात्र, त्यागावात तो खासदार फिरकलाच नसल्याचे आढळराव म्हणाले. तेथील महिला माझ्याकडे आल्या त्यावेळी त्यांनी पाण्याचा प्रश्न मला सांगितला. तेव्हा मी त्या गावात तीन पाण्याचे टँकर सुरू केल्याचे आढळरावांनी यावेळी सांगितले.

follow us