Download App

महायुतीचे हेमंत रासने 5443 मतांनी पुढे…, पुणेमध्ये कोणाची आघाडी अन् कोणाची पिछाडी?

Maharashtra Assembly Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या दोन्ही आघाडीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे कसाब विधानसभा मतदारसंघातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार कसबा मतदारसंघात महायुतीचे हेमंत रासने यांनी दुसऱ्या फेरी अखेर 5443 मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत कसबाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 640 मतांची आघाडी घेतली होती.

तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर सुनिल टिंगरे यांनी 2302 मतांची आघाडी घेतली आहे. तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात चौथी फेरी अखेर महायुतीचे दिलीप वळसे पाटील 91 मतांनी आघाडीवर आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ तिसऱ्या फेरी अखेरीस काँग्रेसचे रमेश बागवे आघाडीवर आहे. रमेश बागवे यांना तिसऱ्या फेरीअखेरीस 832 मतांची आघाडी मिळाली आहे. तर मावळ मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील शेळके चौथी फेरी अखेरीस 14946 मतांनी आघाडीवर आहे.

तर बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्या फेरी अखेर 11174 मतांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरी अखेर अजित पवार यांना 9206 तर युगेंद्र पवार 5007 मते मिळाली आहे. तर मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके यांना 33984 मतांची आघाडी मिळाली आहे.

तर दुसरीकडे पिंपरीत अण्णा बनसोडे आघाडीवर आहे. त्यांनी सहाव्या फेरीत4581 मते घेतली आहे तर सुलक्षणा धर यांनी 3657 मतांची आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरी अखेरीस अण्णा बनसोडे हे 16096 मतांनी आघाडीवर आहे. तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुनील टिंगरे यांनी आठव्या फेरीनंतर 16395 मतांची आघाडी घेतली आहे आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील 24339 मतांनी आघाडीवर आहे.

पुण्यातील 4 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर ,कसबा या चार मतदारसंघात भाजप आघाडीवर आहेत तर हडपसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे आघाडीवर, वडगाव शेरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसचे रमेश बागवे पुढे आणि खडकवासल्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके आघाडीवर आहे.

बातमी अपडेट होत आहे…

follow us