Download App

मनसेचं ठरलं, CM शिंदेंच्या विरोधात उमेदवार देणार नाही; राजकीय ट्विस्टचं कारण..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं निश्चित केलं आहे.

Raj Thackeray : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची लढाई आता हळूहळू स्पष्ट होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीत उतरले आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेही तगडा उमेदवार दिला आहे. यानंतर मनसे या मतदारसंघात उमेदवार देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र निवडणुकीआधीय या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं निश्चित केलं आहे.

CM शिंदेंना बालेकिल्ल्यात आव्हान देणारे केदार दिघे आहे तरी कोण, जाणून घ्या सर्वकाही  

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. ठाकरेंकडून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात देखील तगडा उमेदवार दिला आहे. ठाकरेंनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरेंचे उमेदवार केदार दिघे यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे सांगितले जात होते.

तरीदेखील मनसेची भूमिका काय असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मनसे एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध उमेदवार देणार का हा प्रश्न विचारला जात होता. मात्र याचं उत्तर मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात उमेदवार देणार नाही असा निर्णय मनसेने घेतला आहे. मनसेच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांचं टेन्शन कमी होणार आहे. या मतदारसंघात आता ठाकरे गटाचे केदार दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे.

एकनाथ शिंदे हेच महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा.. संजय शिरसाटांचे मोठे विधान

या निर्णयानंतर आता ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव, ओवळा माजिवडा येथून संदीप पाचांगे आणि मुंब्रा येथून सुशांत सूर्यराव हे मनसेचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा विचार करता मनसे उमेदवार देणार नाही अशी माहिती आहे. याबाबत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरे दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे अशी प्रतिक्रिया दिली.

follow us