Kishan Chand Tanwani : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा मोठा धक्का बसला. ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेले किशनचंद तनवाणी (Kishan Chand Tanwani) यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
कार्यकर्त्यांचा जल्लोष ! शक्तिप्रदर्शन करत चेतन तुपेंनी विजयाचे गणित सांगितलं
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिल्याच यादीत संभाजीनगर मध्य मतदारसंघातून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली. तर शिंदे गटाने प्रदीप जैस्वाल यांना रिंगणात उतरवलं. तर नासिर सिद्दीकी यांना एमआयएमने उमेदवारी दिली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात तिरंगी लढत होणार होती. मात्र, आता ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे.
मीच जिंकणार, कोणताही वाद नाही, अर्ज दाखल करताच बापूसाहेब पठारेंना फुल कॉन्फिडन्स…
याबाबत खुद्द तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. ते म्हणाले की, भापजचा जिल्ह्याध्यक्ष असताना लढलो नाही. गेल्या निवडणुकीत आम्ही प्रदीप जैस्वाल यांना मदत केली होती. आता मी स्वतः प्रदीप जैस्वाल यांच्याकडे गेलो होतो. त्याची आठवणही त्यांना करून दिली. यावेळी त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्र्यांशी बोला, असे त्यांचे म्हणणे आहे. अखेर ही निवडणूक आहे. 2014 सारखी (जलील विजयी झाले होते) परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून मी हा निर्णय हिंदुत्वासाठी घेतल्याचं तनवाणी म्हणाले.
दरम्यान, जाहीर झालेल्या उमेदवाराचे नाव अचानक मागे घेणे हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर आता तनवाणी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. त्यामुळे आता ठाकरे गट दुसरा कोणता उमेदवार देणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.