मीच जिंकणार, कोणताही वाद नाही, अर्ज दाखल करताच बापूसाहेब पठारेंना फुल कॉन्फिडन्स…

  • Written By: Published:
मीच जिंकणार, कोणताही वाद नाही, अर्ज दाखल करताच बापूसाहेब पठारेंना फुल कॉन्फिडन्स…

पुणे: वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार, माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी आज (दि. २८ ऑक्टोबर) रोजी महानिर्धार रॅली काढत अर्ज दाखल केला.

‘मी मनाचा मोठेपणा दाखवला अन् चूक कबूल केली पण…’, भर सभेत अजितदादा भावूक 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पक्ष (सचिन खरात गट) व इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कृषी संस्कृतीचे पाईक असलेले शेतकरी पुत्र बापूसाहेब पठारे यांनी वसुबारसच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. पठारे यांच्या कार्यकर्त्यांनी रॅली दरम्यान वाहतूक कोंडी होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. महाविकास आघाडीची एकजूट यावेळी सुरुवातीपासून दिसून आली.

राज ठाकरेंसाठी चर्चेची दारं खुली आहेत का? संभाजीराजे छत्रपती म्हणाले, अजेंडा सारखाच पण…, 

खराडी गाव ते येरवडा क्षेत्रीय कार्यालय या मार्गाने शक्तिप्रदर्शन करत महानिर्धार रॅली काढण्यात आली. पठारे कुटुंबीय, समाजाच्या सर्व स्तरातील नागरिक, कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीदरम्यान, बापूसाहेब पठारे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. २००९-२०१४ मध्ये ज्या पद्धतीने वडगावशेरी मतदारसंघात मूलभूत पायाभूत सुविधांची उभारणी करत एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यात यशस्वी ठरलो होतो, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळातही शर्थीचे प्रयत्न करणार आहे. रोजगार, महिला सुरक्षा, शहर नियोजन, वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न यांसारख्या समस्यांवर प्राधान्याने तोडगा काढणार आहोत. त्याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी काम करणार असल्याचेही पठारे यांनी सांगितले.

कोणताही वाद नाही, जिंकणार निर्विवाद – बापूसाहेब पठारे
यावेळी पत्रकारांशी बोलताना बापूसाहेब म्हणाले,’कार्यकर्ते आणि जनतेच्या जीवावर मी शंभर टक्के निवडणूक जिंकणार आहे. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता विकास या मुद्द्यावर निवडणूक लढविणार आहे. विरोधकांशी कोणताही वाद घालत बसणार नाही, पण, जिंकणार हे निर्विवाद आहे. हा मतदार संघ चुकीच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न झाले .नियोजनशून्य विकास नको तर नियोजनबद्ध विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. त्यामुळे माझा विजय पक्का आहे. दिवाळीपासूनच आमचे विजयाचे फटाके वाजणार आहेत.’

निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारावकर यांच्याकडे अर्ज दाखल केला.

यावेळी प्रकाश म्हस्के, भिमराव गलांडे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, राजेंद्र उमाप, किशोर विटकर, भयासाहेब जाधव, काँगेसचे माजी नगरसेवक सुनील मलके, संगीता देवकर, राजू ठोंबरे, रमेश सकट, विल्सन चंदेवळ, शिवसेनेचे सागर माळकर, आनंद गोयल, नितीन भुजबळ, शांताराम खलसे, राजेंद्र खांदवे, आशिष माने, शैलेश राजगुरू, आम आदमी पक्षाचे अमित म्हस्के, आरपीआयचे सचिन खरात यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पक्ष (सचिन खरात गट) व इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube