वडगाव शेरीत बापूसाहेब पठारे यांच्याकडून बेरजेचं राजकारण; भाजपमधील दुरावलेला भाचा केला आपलासा

  • Written By: Published:
वडगाव शेरीत बापूसाहेब पठारे यांच्याकडून बेरजेचं राजकारण; भाजपमधील दुरावलेला भाचा केला आपलासा

Vadgaon Sheri Assembly Election 2024 : तुतारी हातात घेऊन वडगाव शेरीवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळविण्यासाठी माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी बेरजेचे राजकारण सुरू केलं आहे. (Vadgaon Sheri ) गेल्या अनेक वर्षांपासून (Election) दुरावलेले भाचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संतोष भरणे आणि पठारे यांची दिलजमाई झाली आहे. यामुळे पठारे परिवार एकत्र आल्याचं चित्र आहे.

अनेक वर्षांपासन एकमेंकांविरोधात लढत असलेले पठारे आणि भरणे मामा- भाचे अखेर एकत्र आले आहेत. यावेळी बापू पठारे यांचे पुतणे माजी नगरसेवक महेंद्र पठारे, विधानसभा निवडणुकीची धुरा सांभाळणारे युवा नेते सुरेंद्र पठारे उपस्थित होते. पठारे यांचे वडगाव शेरी मतदारसंघात मोठे नातेगोते आहे. या दिलजमाईमुळे संपूर्ण परिवार एकत्र आला आहे.

अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; लंकेंच्या पारनेरात काशिनाथ दातेंना तिकीट

2009 च्या विधानसभा निवडणुकीत पठारे – भरणे जोडी वडगाव शेरीत गाजली होती. पठारे यांच्या प्रचाराची धुरा भरणे यांनी सांभाळली होती. संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याने पठारे यांचा विजय सुकर झाला होता. त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीतही पठारे यांनी या भागातील सर्व प्रभागांवर एकतर्फी वर्चस्व मिळविले. 2017 च्या महापालिका निवडणुकीत मात्र भरणे आणि पठारे यांचे संबंध दुरावले. उमेदवारीसाठी डावलले जात असल्याची भावना झाल्याने संतोष भरणे यांनी वेगळी वाट धरली. शिवसेनेत प्रवेश करून पठारे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात पॅनल उभे केलं.

या निवडणुकीत बापू पठारे यांचे पुतणे महेंद्र पठारे यांच्या विरोधात लढताना त्यांना 9, 593 मते मिळाली होती. शिवसेनेची कोणतीही ताकद नसलेल्या या भागातील मते वैयक्तिक भरणे यांचीच होती, हे स्पष्ट होतं. बापू पठारे 2019 ची विधानसभा निवडणूक लढले नाहीत. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर महायुतीच्या जागावाटपात ही जागा मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांना उमेदवारीही जाहीर झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube