Download App

माझ्या कुटुंबीयांना दु:ख झालं, नऊ वर्षानंतर…’, अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची प्रतिक्रिया

Rohit Patil On Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून

  • Written By: Last Updated:

Rohit Patil On Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. आज तासगावात एका जाहीर सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

तासगाव येथे बोलताना आर.आर. पाटील (R.R. Patil) यांनी माझा केसाने गळा कापला, 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांच्या चौकशी फाईलवर त्यांनी सह्या केल्या असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. आज अजित पवार तासगाव येथे संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांवर आता आर आर पाटील यांचे चिरंजीव आणि तासगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पाटील (Rohit Patil) यांनी आपली प्रतिकिया दिली आहे.

रोहित पाटील म्हणाले की, अजितदादा वयानं मोठे आहेत, एकेकाळी त्यांनी नेतृत्व केलं आहे आणि आम्ही देखील त्यांचं नेतृत्व स्वीकारत काम केलं आहे. पक्षफुटीनंतर आदरणीय पवार साहेबांचं आबांच्या जडणघडणीतील योगदान लक्षात घेता आबा असते तर पवार साहेबांसोबत उभे राहिले असते. याचा विचार करून आम्ही पवार साहेबांसोबत ताकदीनं उभे राहण्याची भूमिका घेतली.

मी अजितदादांचं स्टेटमेंट ऐकलं आहे. माझे वडील जाऊन नऊ – साडे नऊ वर्ष झाली आहे. अजितदादांनी नऊ – साडे नऊ वर्षानंतर ही मळमळ बोलून दाखवली. माझ्या कुटुंबीयांना दु:ख झालं आहे. असं रोहित पाटील म्हणाले.

पुढे बोलताना रोहित पाटील म्हणाले की, त्या काळी काय घडलं याची उत्तर आबा गेल्यानंतर आम्ही देऊ शकत नाही आणि त्यावेळी काय घडामोडी असतील, काय घडलं असेल त्याची उत्तर आबा हयात नसताना देऊ शकत नाही. आबा प्रामाणिकपणानं, स्वच्छपणानं काम करत होते. आबा जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी पारदर्शकपणे पोलीस भरती करून घेतली. चांद्यापासून बांद्यापर्यंत चांगलं काम केले आणि ते गेल्यानंतर नऊ साडे नऊ वर्षांनी असा आरोप होत असेल तर दुःख होत आहे असं देखील रोहित पाटील म्हणाले.तसेच अजितदादा ज्येष्ठ आहेत, नऊ वर्षात त्यांच्या नेतृत्त्वात काम केलं आहे. आज त्यांच्या वक्तव्यानं कुटूंबियांना दुःख झालंय, सर्व कार्यकर्तांना दुःख झालं आहे असेही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार

तासगाव येथे संजय काका यांच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, 70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती आणि त्यावेळी गृहमंत्री असणारे आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी यासाठी फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झाली मात्र माझ्या फाईलवर राज्यपालांनी सही केली नाही.

… म्हणून संगमनेरमधून उमेदवारी नाही, सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं

सरकार बदललं 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी माझ्यावर कारवाई करण्यासाठी फाईलवर सही केली. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर मला बोलवून आर आर पाटील यांनीचा तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. मी ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्याच आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता. असं अजित पवार म्हणाले.

follow us