… म्हणून संगमनेरमधून उमेदवारी नाही, सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं
Sujay Vikhe : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या विरोधात नगरचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला महायुतीच्या जागावाटपामध्ये ही जागा गेल्याने महायुतीकडून अमोल खताळ (Amol Khatal) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे यांचा पत्ता कट झाला आहे. संगमनेर (Sangamner) विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे यांना संधी न मिळाल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, संगमनेरची जागा भाजपला मिळावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्यामुळे ही जागा अगदी शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली आहे. जागावाटपामध्ये 8 ते 10 जागा शेवटच्या टप्प्यात उरल्या होत्या आणि या जागांवर वरच्या स्तरावर वाटाघाटी झाल्या आणि ही जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली असं माजी खासदार सुजय विखे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले की, ज्या पद्धतीचा वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाला होता. दुर्देवीबाब आहे की त्याठिकाणी ते वाक्य माझ्या स्टेजवरून बोलल गेल्याने त्यांना संधी मिळाली मात्र ही संधी त्यांना लोकशाही पद्धतीने नाहीतर दडपशाही पद्धतीने मिळाली आणि माझ्या विरोधात त्या ठिकाणी नेरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून वरच्या पातळीवर निर्णय होऊन ती जागा शिवसेना शिंदे गटाला गेली असावी. असं देखील माजी खासदार सुजय विखे म्हणाले.
तसेच आम्ही सगळ्या बाजूने तयार होतो आपला सर्व्हे ग्रामीण भागातून तयार होता असेही ते म्हणाले. मी भाजपचा माजी खासदार असल्याने मी शिवसेना शिंदे गटात जाऊ शकलो नसतो त्यामुळे आम्ही अमोल याच नाव शिंदे गटाच्या जागेसाठी सुचवलं असेही यावेळी सुजय विखे म्हणाले. तसेच ज्या लोकांनी मारहाण केली होती. ज्या लोकांवर 144 अंतर्गत 307 कलम दाखल आहे. त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. जर यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही संगमनेरमध्ये मोठा आंदोलन उभारू असा इशारा देखील यावेळी माजी खासदार सुजय विखे यांनी दिला.
अजितदादांचा भाजपला धक्का; विरोध असतानाही नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर
काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे सुजय विखे यांच्या संकल्प सभे बोलताना भाजप नेते वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असल्याचा आरोप सुजय विखे यांनी केला होता.