Download App

संविधान सन्मान सभा: संभाजीराव निलंगेकरांसाठी मंत्री आठवले मैदानात !

रविवारी दहा वाजता निलंगा येथे संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

  • Written By: Last Updated:

Nilanga Assembly Constituency:विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. वेगवेगळ्या भागात नेतेही सभा गाजवत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही आता प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. ते वेगवेगळ्या भागात महायुतीच्या उमेदवारीसा सभा घेत आहेत. निलंगा मतदारसंघाचे (Nilanga Assembly Constituency) महायुतीचे उमेदवार संभाजीराव निलंगेकर (Sambhajirao Nilangekar) यांच्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे सभा घेत आहे.

संभाजीराव पाटील निलंगेकरांचे हात बळकट, काँग्रेसच्या गोविंद शिंगाडेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश…

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रविवारी दहा वाजता निलंगा येथे संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या ; संभाजीराव पाटील निलंगेकरांनी साधला थेट मतदारांशी संवाद

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी मंत्री व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, तर अध्यक्ष म्हणून माजी खासदार सुनील गायकवाड राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनिअर विश्वजित गायकवाड, भाजपा अनुसूचित मोर्चा अध्यक्ष संतोष वाघमारे, माजी जि .प सदस्य कुसुमताई हलसे, हनुमान जाकते, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, दिलीप गायकवाड, धम्मानंद काळे, एन. डी. सोनकांबळे, देविदास कांबळे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

follow us