Download App

नोटिशीला घाबरत नाही, निष्पापांना न्याय मिळाला पाहिजे, सुषमा अंधारेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल 

Sushma Andhare On Porsche Car Case : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. मात्र त्यापूर्वी शिवसेना (Shivsena) उपनेत्या सुषमा

  • Written By: Last Updated:

Sushma Andhare On Porsche Car Case : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. मात्र त्यापूर्वी शिवसेना (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पत्रकार परिषद घेत कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणावरून ( Porsche Car Case) पुन्हा एकदा वडगाव शेरीचे आमदार आणि महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या की, वडगाव शेरीमध्ये विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात येत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (MVA) बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून सुनील टिंगरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र त्यांच्याबद्दल आम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही.

सुनील टिंगरे यांनी काही नोटीस इश्यू केले आहेत त्यांनी नोटीस इशू करणे हा त्यांचा निर्णय आत्मघाती आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणाला काल सहा महिने झाले सहा महिन्यानंतर देखील दोन जीव गेले त्यांना अजून न्याय मिळाला नाही. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी आमदारांची चौकशी करण्यासाठी गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितली होती. गृहमंत्र्यांनी पाठीशी घातला म्हणून ते वाचले आहेत का ? तो फोन आला तो फोन अजित पवारांचा होता असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

तुम्ही पिझ्झा बर्गर घेऊन एका आरोपीसाठी गेला होता, गोरगरिबांचे काम करणे ही लोकप्रतिनिधीचे काम आहेत. एका आरोपीसाठी पिझ्झा बर्गर घेऊन जाणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहेत का? याचा विचार तुम्ही करावा. रक्ताचे नमुने बदललेल्या आरोपीला मिळालेल्या रकमेची चौकशी पोलीस करणार होते मात्र ती चौकशी का थांबली?  या तपासाची परवानगी पोलीस आयुक्तांनी मागितली होती मात्र ही चौकशी का थांबली ग्रह खात्यात सोबत सत्तेत असणारी पार्टनरशिप हे काय वेगळं सांगायची गरज नाही.

पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत आणखीन एक मुलगा होता तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा होता याचा उलगडा अजून झाला नाही. पोर्शे कार अपघात प्रकरणात तुमचा सहभाग होता हे तुम्ही अमान्य करू शकाल का? हे प्रकरण चालू असताना तुम्ही कुठे गायब होतात पोलीस आणि माध्यमांच्या समोर तुम्ही का आला नाही? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कोणी दबाव केला?  तुम्हाला उमेदवारी देताना हाच मुद्दा अडचणीचा होता ही महायुतीतील चर्चा आमच्यापर्यंत पोहोचले आहे. असं या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधेरे म्हणाल्या.

तर यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर देखील टीका केली आहे. शोपीस बहुल्यांवर मी बोलत नाही. पाशा पटेल वामन म्हात्रेंवर कारवाई करता येत नाही अशा शोपीस बहुल्यांवर मी बोलत नाही. अशी टीका या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुषमा अंधेरे म्हणाल्या.

दुपदरी उड्डाणपूल अन् एमआयडीसीचा विस्तार, 2029 साठी संग्राम जगतापांचे व्हिजन कोणते?

प्रकरण काय

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले होते.

follow us