Download App

Vidhansabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवस तळ ठोकणार, पहिली सभा धुळ्यात

विधानसभा निवडणुकीसाठी मोदींची राज्यातील पहिली सभा धुळे येथे होणार आहे. 8 नोव्हेंबरपासून त्यांच्या प्रचार सभांना सुरुवात होणार आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) अर्ज दाखल झाल्यानंतर आता प्रचाराला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आता महायुतीच्या (Mahayuti) प्रचाराची झंझावाती सुरुवात करणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मोदींची राज्यातील पहिली सभा धुळे येथे होणार आहे. 8 नोव्हेंबरपासून त्यांच्या प्रचार सभांना सुरुवात होणार आहे.

… तर मशिदींवरून लाऊडस्पीकर उतरवणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा 

दिवाळीनंतर आता प्रचाराचे फटाके फुटण्यास सुरूवात झाली. भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून अनेक केंद्रीय मंत्रीही प्रचारासाठी जाणार आहेत. महायुतीने लोकसभेप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा राज्यात आयोजित केल्यात. महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे सर्वात मोठे स्टार प्रचारक ठरणार आहे. राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधानांच्या 10 प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले. 8 नोव्हेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा सुरू होणार आहेत. सर्व प्रथम धुळे व नाशिक येथे सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यानंतर ते दुसऱ्या दिवशी (9 नोव्हेंबर) अकोला आणि नांदेडमध्ये त्यांची सभा होणार आहे.

मनसेचे दोनही आमदार निवडूण येणार नाहीत अन् मशिदीवरील भोंग हटणार नाहीत…; आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं 

तर 12 नोव्हेंबर रोजी चिमूर, सोलापूर आणि पुणे येथे मोदींच्या सभा होणार आहेत. 14 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, रायगड, आणि नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोदींच्या सभांचा कार्यक्रम-
8 नोव्हेंबर (दुपारी 12 वाजता) – धुळे
8 नोव्हेंबर (दुपारी 2 वाजता) – नाशिक

9 नोव्हेंबर (दुपारी 12 वाजता) – अकोला
9 नोव्हेंबर (दुपारी 2 वाजता) – नांदेड

12 नोव्हेंबर रोजी चिमूर, सोलापूर, पुणे

14 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, रायगड, मुंबई

follow us