Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Election 2024) पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) मोठी कारवाई करत खेड शिवापूरच्या (Khed Shivapur) परिसरात खासगी वाहनातून मोठी रक्कम जप्त केली आहे. माहितीनुसार या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल पाच कोटी रुपये सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ही कार पुणे ते कोल्हापूर या दिशेने गाडी प्रवास करत होती आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी खेडशिवापूर टोलनाक्याजवळ ही गाडी पकडली. प्राथमिक माहितीनुसार या कारमध्ये सोलापूरच्या एका बड्या नेत्याचे कार्यकर्ते होते अशी माहिती समोर आली आहे.
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदार होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभेसाठी आतापर्यंत भाजपकडून (BJP) 99 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे तर पुढील एक- दोन दिवसात शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे तर महाविकास आघाडी (MVA) देखील 25 ऑक्टोबरपर्यंत पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
संजय राऊतांची टीका
तर दुसरीकडे या प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले आहे. त्यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले, हे आमदार कोण? काय झाडी…, काय डोंगर…., मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले 15 कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.., किती हे खोके? अशी टीका त्यांनी आपल्या ट्विट केले आहे.
मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले!
हे आमदार कोण?
काय झाडी…
काय डोंगर….
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले
१५ कोटी चा हा पहिला हप्ता!काय बापू..
किती हे खोके?
@ECISVEEP
@AmitShah
pic.twitter.com/tb7DuPWV3W— Sanjay Raut (@rautsanjay61) October 21, 2024
Emerging Asia Cup 2024 मध्ये भारताने UAE चा सात विकेटने उडवला धुव्वा, अभिषेक शर्मा ठरला हिरो!