Namdeo Jadhav : मीच रक्ताचा वंशज, सिंदखेड-राजाच्या वंशजांना 10 कोटींची नोटीस पाठवणार!
Namdev Jadhav : आपणच राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांचे रक्ताचे वंशज असल्याचा दावा मराठी लेखक आणि व्याख्याते नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी केला आहे. महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज गोपालराजे जाधव (Gopalraje Jadhav ) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांना (Rohit Pawar) जे पत्र लिहिलं आणि त्यात जे आरोप केले, त्यावर आपण 10 कोटींची आब्रूनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचा इशाराही नामदेव जाधव यांनी दिला आहे. नामदेव जाधव (Namdeo Jadhav) यांनी लेट्सअपशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची सडेतोडपणे उत्तरं दिली.
नामदेव जाधव हे स्वतःला राजमाता जिजाऊंचे थेट वंशज म्हणवून घेतात पण ते तोतया असून ते लोकांकडून पैसे उकळतात असा थेट आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला होता. याशिवाय महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज गोपालराजे जाधव यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांना पत्र लिहून नामदेव जाधव आणि सिंदखेड राजाच्या घराण्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.
पुण्याचं ‘गुपित’ सांगण्याच्या रामदासभाईंच्या इशाऱ्याने कीर्तिकर घायाळ : म्हणाले, ‘नो कॉमेंट्स’
यावर नामदेव जाधव म्हणाले की, आरोप करायला लोकशाहीमध्ये मोकळेच आहेत. मी कोणाचा वंशज आहे? कितवा वंशज आहे? कुठून वंशज आहे? कसा वंशज आहे? ही खासगी बाब आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती पदावर असते, ती बाब शासकीय असते. माझ्या वंशावळीबद्दल कोणी प्रश्न विचारावा? कोणाला विचारावा? ज्या कोणाचं कोणी अंधारात पत्र लिहून घेतंय, याच्या खोलात आपण जायला नाही पाहिजे. ज्या व्यक्तीकडून कोणी काही लिहून घेतंय, ती व्यक्ती अधिकृत आहे का? मूळ मुद्दा माझी वंशावळ हा नाहीच.
मूळ मुद्दा हा आहे की, 23 मार्च 1994 चा जीआर आणि त्याच्यातून मराठा समाजाचं झालेलं नुकसान तो मुद्द्याला फाटा देण्यासाठी लोकं इकडचे तिकडचे मुद्दे बाहेर काढत आहेत. त्या मुद्द्याला आम्ही नंतर सविस्तर उत्तर देईल. त्या विषयाला उत्तर देण्यासाठी 24 डिसेंबरनंतर आपल्याकडे राखीव वेळ आहे. सध्या आमचा विषय तेवढाच आहे की, 23 मार्च 1994 चा जीआर मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण मराठ्यांना का मिळालं नाही?
World Cup 2023: विश्वचषकात भारतीय गोलंदाजांचा दबदबा, 9 सामन्यांत 90 पैकी घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स
नामदेव जाधव यांना लखोजीराव जाधव यांचे वंशज गोपालराजे जाधव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल विचारताच ते म्हणाले की, ते काय म्हणतात याच्याशी माझा काही संबंध नाही. त्यांनी जे काही पत्र लिहून पराक्रम केलाय, त्याबद्दल मीच त्यांना 10 कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवणार आहे, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. जर एखादी गोष्ट त्यांना माहित नाही तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तालुक्याच्या बाहेर पडून पुण्याला यायला पाहिजे. पुरंदर किल्ला बघायला पाहिजे. खेड शिवापूर कुठे आहे? ते पाहिलं पाहिजे. इथे जाधवांची किती गावं आहेत? ते पाहिलं पाहिजे. मग त्यांच्या लक्षात येईल, असेही नामदेव जाधव म्हणाले.
शरद पवारांच्या दाव्यावर काय म्हणाले?
शरद पवार यांनी सांगितलं की, माझी जात काय आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यावर जाधव म्हणाले की, कोणाला कोणाचा कळवळा आहे? याच्यावरुन ती दिसत नाही का? जर त्यांना मराठ्यांचा कळवळा असता तर त्यांनी या मराठ्यांच्या पाच कोटी लेकरांना त्यांनी उपेक्षित ठेवलं असतं का? असाही सवाल यावेळी जाधव यांनी उपस्थित केला. जो-तो आपापल्या जातीसाठी झटतोय. गरुड गरुडाचं काम करतोय, ससा त्याचं काम करतोय. मासा मास्याचं काम करतोय. इथला प्रत्येक नेता आपापल्या जातीचं बोलतोय. पण ज्यांना आम्ही मराठा समाजाचा नेता समजतोय ते काहीच बोलत नाहीत, हाच चिंतेचा विषय आहे आमच्यासाठी, असेही जाधव म्हणाले.