पुण्याचं ‘गुपित’ सांगण्याच्या रामदासभाईंच्या इशाऱ्याने कीर्तिकर घायाळ : म्हणाले, ‘नो कॉमेंट्स’
मुंबई : रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रतिआरोप करायचे या भुमिकेत मी नाही. माझ्या दृष्टीने मी या सगळ्या वादावर पडदा टाकला आहे. या सगळ्या वादाबाबत मी माझे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सविस्तर निवेदन केले आहे. त्यात माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत सुरु असलेल्या वादावर पडदा टाकला आहे. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलत होते. (MP Gajanan Kirtiar reply on Shivsena leader ramdas kadam allegation’s)
काय म्हणाले गजानन कीर्तिकर?
रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रतिआरोप करायचे या भुमिकेत मी नाही. माझ्या दृष्टीने मी या सगळ्या वादावर पडदा टाकला आहे. या सगळ्या वादाबाबत मी माझे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सविस्तर निवेदन केले आहे. त्यात माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझा त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहोत. मला एक कळत की आम्ही ज्येष्ठ आहोत, आम्हीच जर असं भांडत बसलो आणि वाकयुद्दध सुरु झाले तर खालच्या शिवसैनिकाला चांगला संदेश जाणार नाही, याची मला जाणीव आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी आता कितीही टीकाटिपण्णी केली तरी मी त्यावर मी कोणतेही भाष्य करणार नाही आणि तसा शब्द मी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. याशिवाय आमच्या तिघांमध्ये एखादी बैठक झाल्यास त्यात काय असेल ते निर्णय होईल, असेही कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.
पत्नीशी गद्दारी केलीत… पुण्याला शेण खायला जाता का? रामदासभाईंनी कीर्तिकरांचं ‘सगळचं काढलं’!
दोघांमधील वाद कशामुळे?
मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिवसेनेचे हे दोन ज्येष्ठ नेते आमने-सामने आले आहेत. अलीकडेच कदम यांनी त्यांचा मुलगा सिद्धेश कदम याच्यासाठी या मतदारसंघावर दावा केला होता. त्यास गजानन कीर्तिकरांनी विरोध दर्शवला होता आणि या जागेवरुन आपण निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. त्यावरुनच दोघांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
रामदास कदम काय म्हणाले होते?
गजाभाऊ, तुम्ही माझ्या याच खुर्चीवर बसून सांगत होता की आता माझे वय झाले, मी लोकसभेची निवडणूक लढविणार नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तुमच्या मुलाला लोकसभेची तिकीट जाहीर केल्यानंतर तुम्ही लगेच जवान कसे झाला? लगेच तुम्ही इथून निवडणूक लढावायला तयार झालात? मग आपल्या मुलाला निवडून देण्यासाठी तिकीट घ्यायची आणि घरी बसायचं, आपल्याला मुलाला निवडून द्यायचं असं काही नाही ना? मग इतका बदल आपल्यात का झाला? थोडा अविश्वास निश्चितपणे दाखवला जाणार होता, नाईलाज होता. कारण तुम्ही आणि तुमचा चिरंजीव मुलगा एकाच ऑफिसमध्ये बसता. तुमचा सगळा फंड तोच वापरतो. मग बाप-बेटा एकमेकांसमोर उभा राहण्याचा नाटक कशासाठी करत आहात? हाच माझा प्रश्न होता.
भाऊ त्यानंतर तुम्ही माझ्याविरोधात प्रेसनोट काढलीत. मला त्यात बरंच काही बोलून गेलात. पण भाऊ तुम्हाला माझ्याविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. रामदास कदमने कधीच गद्दारी केली नाही. उलट तुम्ही तुमच्या पत्नीशी गद्दारी केली आणि शेण खायला तुम्ही पुण्याला जाता. हे सगळं बोलू का? महाराष्ट्राला सांगू का? मला हे बोलायला लावू नका. ज्येष्ठ नेते म्हणून कालपर्यंत तुमची इज्जत ठेवली.
“वय झाल्याने गजानन किर्तीकर भ्रमिष्ट झालेत” : गद्दारीच्या टिकेनंतर रामदास कदम चवताळले
गुहागर मतदारसंघात अनंत गितेंनी मला पाडायचे काम केले, मी त्यांना पाडायचा प्रयत्न केला नव्हता. 33 वर्षापूर्वी तुम्ही माझ्या कामावर निवडून आलात आणि 33 वर्षानंतर तुम्हाला आता साक्षात्कार झाला की तुम्हाला मी पडायचा प्रयत्न केला. गजाभाऊ तुम्ही मला गद्दारीचा शिक्का लावण्याचा प्रयत्न केला, पण लोकाधिकार समितीच्या माध्यमातून तुम्ही सुधीर भाऊच्या पाठीत खंजीर खुपसलात, तुम्ही गद्दार केली. हे मला बोलायचं नव्हतं पण गद्दार तुम्ही आहात, गद्दारी तुमच्या नस-नसात आहे. तुमचं पितळ उघड पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुमचं पित्त खवळलं. त्यानंतर इतर नेत्यांना गद्दार म्हणत आहात. महाराष्ट्र तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
CM शिंदेंचा साधेपणा! मिसळीचा घेतला सहकाऱ्यांसोबत आस्वाद; स्वत: भरलं बिल, कामगारांना दिलं दिवाळी गिफ्ट
गजाभाऊ तुमचं राजकारण मला चांगलं माहिती आहे. मी तुमच्या मुळावर उठलो, तुम्ही खरे काय आहे, हे सांगायला लावू नका. मला बोलायला लावू नका. महिलाही तुम्हाला मत देणार नाहीत. तुम्हाला चपलीने मारतील. तुमची अडचण होईल, तुमचं वस्त्रहरण करायला लावू नका, असा इशाराही रामदास कदम यांनी यावेळी दिला होता. यानंतर आता कीर्तिकर यांनी या आरोपांवर प्रत्युत्तर देणे टाळले असून आपल्या बाजूने या वादावर पडदा पडला असल्याचे स्पष्ट केले आहे.