पत्नीशी गद्दारी केलीत… पुण्याला शेण खायला जाता का? रामदासभाईंनी कीर्तिकरांचं ‘सगळचं काढलं’!

पत्नीशी गद्दारी केलीत… पुण्याला शेण खायला जाता का? रामदासभाईंनी कीर्तिकरांचं ‘सगळचं काढलं’!

मुंबई : रामदास कदमने कधीच गद्दारी केली नाही, उलट तुम्ही तुमच्या पत्नीशीही गद्दारी केली. पुण्याला काय शेण खायला जाता का? हे महाराष्ट्राला सांगू का मी? बोलू का? आम्हाला ते बोलायला लावू नका, असं म्हणत शिवसेना (Shivsena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांना ‘खासगी’ आयुष्यातील गोष्टी काढण्याचा इशारा दिला आहे. रामदास कदम यांना गद्दारीचा फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, असा खोचक टोला कीर्तिकर यांनी कदम यांना लगावला होता. यावर कदम यांनी प्रत्युत्तर दिले. (Shiv Sena leader Ramdas Kadam has warned Shiv Sena leader, MP Gajanan Kirtikar will told things from his ‘private’ life)

दोघांमधील वाद कशामुळे?

मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिवसेनेचे हे दोन ज्येष्ठ नेते आमने-सामने आले आहेत. अलीकडेच कदम यांनी त्यांचा मुलगा सिद्धेश कदम याच्यासाठी या मतदारसंघावर दावा केला होता. त्यास गजानन कीर्तिकरांनी विरोध दर्शवला होता. त्यावरुनच दोघांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

काय म्हणाले रामदास कदम?

गजाभाऊ, तुम्ही माझ्या याच खुर्चीवर बसून सांगत होता की आता माझे वय झाले, मी लोकसभेची निवडणूक लढविणार नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तुमच्या मुलाला लोकसभेची तिकीट जाहीर केल्यानंतर तुम्ही लगेच जवान कसे झाला? लगेच तुम्ही इथून निवडणूक लढावायला तयार झालात? मग आपल्या मुलाला निवडून देण्यासाठी तिकीट घ्यायची आणि घरी बसायचं, आपल्याला मुलाला निवडून द्यायचं असं काही नाही ना? मग इतका बदल आपल्यात का झाला? थोडा अविश्वास निश्चितपणे दाखवला जाणार होता, नाईलाज होता. कारण तुम्ही आणि तुमचा चिरंजीव मुलगा एकाच ऑफिसमध्ये बसता. तुमचा सगळा फंड तोच वापरतो. मग बाप-बेटा एकमेकांसमोर उभा राहण्याचा नाटक कशासाठी करत आहात? हाच माझा प्रश्न होता.

भाऊ त्यानंतर तुम्ही माझ्याविरोधात प्रेसनोट काढलीत. मला त्यात बरंच काही बोलून गेलात. पण भाऊ तुम्हाला माझ्याविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. रामदास कदमने कधीच गद्दारी केली नाही. उलट तुम्ही तुमच्या पत्नीशी गद्दारी केली आणि शेण खायला तुम्ही पुण्याला जाता. हे सगळं बोलू का? महाराष्ट्राला सांगू का? मला हे बोलायला लावू नका. ज्येष्ठ नेते म्हणून कालपर्यंत तुमची इज्जत ठेवली.

“वय झाल्याने गजानन किर्तीकर भ्रमिष्ट झालेत” : गद्दारीच्या टिकेनंतर रामदास कदम चवताळले

गुहागर मतदारसंघात अनंत गितेंनी मला पाडायचे काम केले, मी त्यांना पाडायचा प्रयत्न केला नव्हता. 33 वर्षापूर्वी तुम्ही माझ्या कामावर निवडून आलात आणि 33 वर्षानंतर तुम्हाला आता साक्षात्कार झाला की तुम्हाला मी पडायचा प्रयत्न केला. गजाभाऊ तुम्ही मला गद्दारीचा शिक्का लावण्याचा प्रयत्न केला, पण लोकाधिकार समितीच्या माध्यमातून तुम्ही सुधीर भाऊच्या पाठीत खंजीर खुपसलात, तुम्ही गद्दार केली. हे मला बोलायचं नव्हतं पण गद्दार तुम्ही आहात, गद्दारी तुमच्या नस-नसात आहे. तुमचं पितळ उघड पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुमचं पित्त खवळलं. त्यानंतर इतर नेत्यांना गद्दार म्हणत आहात. महाराष्ट्र तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

CM शिंदेंचा साधेपणा! मिसळीचा घेतला सहकाऱ्यांसोबत आस्वाद; स्वत: भरलं बिल, कामगारांना दिलं दिवाळी गिफ्ट

गजाभाऊ तुमचं राजकारण मला चांगलं माहिती आहे. मी तुमच्या मुळावर उठलो, तुम्ही खरे काय आहे, हे सांगायला लावू नका. मला बोलायला लावू नका. महिलाही तुम्हाला मत देणार नाहीत. तुम्हाला चपलीने मारतील. तुमची अडचण होईल, तुमचं वस्त्रहरण करायला लावू नका, असा इशाराही रामदास कदम यांनी यावेळी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube