Rahuri Assembly constituency : राहुरी शहरात भारतीय जनता पार्टीच्या (BJP) कार्यकर्त्यांची प्रचारफेरी सुरू असताना महाआघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे (Prajatk Tanpure) समर्थक कार्यकर्त्यांनी प्रचार करण्यास अडथळा आणल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी केलाय. याप्रकरणी कर्डिले व कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आलीय.
शिवाजीराव कर्डिले यांची ताकद वाढली; अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने दिला जाहीर पाठिंबा
राहुरी येथील आझाद चौक परिसरात भाजपा व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांची प्रचार फेरी सुरू होती. या ठिकाणी आमदार तनपुरे समर्थक कार्यकर्ते कर्डिले यांचे पॉम्पलेट जमा करून फेकू लागले. तसेच प्रचार फेरी बंद करून भाजपा उमेदवार करणे यांचा प्रचार करण्यास विरोध करू लागले, असा आरोप कर्डिले यांच्याकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतरह भाजप समर्थक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाले. हा प्रकार समजतात भाजप उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी पोलीस स्टेशन गाठत या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला. आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जात असून आमच्या सहनशक्तीचा कुणीही अंत पाहू नये विरोधी उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा पराभव आता अटळ असल्याने त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून आमच्यावर आरोप प्रत्यारोप करणे, वाद करण्याचा प्रयत्न करणे, प्रचार करण्यास अडथळे आणणे असे प्रकार सुरू झाले असून आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जात असून कोणाच्याही धमकीला किंवा विरोधाला भीक घालत नाही मात्र आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
Bapusaheb Pathare : बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीमध्ये महिलांचा झंझावात
यावेळी शिवसेना नेते राजूभाऊ शेटे पाटील, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, शिवसेना तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे माजी विरोधी पक्षनेते शिवाजी उर्फ दादापाटील सोनवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील भट्टड, भाजपा शहराध्यक्ष भैय्यासाहेब शेळके, गणेश खैरे, रवींद्र म्हसे, विराज धसाळ, नारायण धोंगडे, सचिन मेहेत्रे, भाऊसाहेब पवार, शिवाजी डौले, आबासाहेब येवले, सुरेश भुजाडी, नारायण धोंगडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.