Prajakt Tanpure News : विधानसभा निवडणुकासाठी (Assembly Election) येणाऱ्या काही दिवसांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, आता त्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. यातच राहुरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी प्रचारात आघाडी घेत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर जोरदार टीका केलीयं. शेतमालाला भाव, दुधाला भाव, गावातील अंतर्गत रस्ते, शेतकऱ्यांना दिवसा वीज हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन ही योजना नवीन सरकारने बंद केल्यामुळे नगर तालुक्यातील अनेक गावे रस्त्यांपासून वंचित राहिली. आमदार तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी असतो सत्तेचा गैरवापर, दहशत करण्यासाठी नसतो. त्यामुळे सत्तेचा गैरवापर दहशत, दमदाटी करणाऱ्यांना घरी बसवा अशा शब्दात तनपुरे यांनी नामोउल्लेख टाळात भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर निशाणा साधलायं.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा राहुरी मतदार संघातून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तनपुरे यांनी प्रचाराचा नारळ फोडत मतदात संघातील नागरिकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहे. तनपुरे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असून खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी, मांजरसुंभा, डोंगरगण, चापेवाडी, इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, पिंपळगाव उज्जैनी, शेंडी, पोखर्डी, धनगरवाडी या गावांनी तनपुरे यांनी गाव भेटी दिल्या. गाव भेटीदरम्यान तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जन आशीर्वाद यात्रेस दिसून आला.
जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा ‘ट्रम्प’ यांच्या हातात; राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी कसा होतो?
यावेळी बोलताना तनपुरे यांनी कर्डिले यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी हितासाठी आम्ही अनेक योजना सुरू केलेल्या होत्या. मात्र, राज्यात सत्तांतर झाले व आघाडी सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या योजना नवीन सरकारने बंद केल्या. योजनेमध्ये दोन हजार कोटी रुपये शिल्लक असताना योजना बंद केली गेली अन्यथा अनेक सब स्टेशन, रोहित्र बसवून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते. पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येणार असून सर्व शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.
आज महासत्तेचा फैसला! ट्रम्प अन् हॅरीस यांच्यात काँटे की टक्कर; कोण होणार अमेरिकेचा नवा अध्यक्ष?
पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, शेतमालाला भाव, दुधाला भाव, गावातील अंतर्गत रस्ते, शेतकऱ्यांना दिवसा वीज हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन ही योजना नवीन सरकारने बंद केल्यामुळे नगर तालुक्यातील अनेक गावे रस्त्यांपासून वंचित राहिली. आमदार तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी असतो सत्तेचा गैरवापर, दहशत करण्यासाठी नसतो. त्यामुळे सत्तेचा गैरवापर दहशत, दमदाटी करणाऱ्यांना घरी बसवा असे आवाहन तनपुरे यांनी केले.