जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा ‘ट्रम्प’ यांच्या हातात; राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी कसा होतो?

  • Written By: Published:
जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा ‘ट्रम्प’ यांच्या हातात; राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी कसा होतो?

US president election 2024 : अमेरिकेत पार पडलेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि डेमोक्रॅट पक्षाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्यात काटे की टक्कर पाहण्यास मिळाली. मात्र, हाती आलेल्या निकालांनुसार डोनाल्ड ट्रमप यांनी बहुमत गाठलं असून, अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व घडामोडींमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांना कोण शपथ देतो आणि शपथ घेण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊया.

Ajit Pawar Manifesto : लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर, बारामतीसाठी दादांच्या ‘गेम चेंजर’ घोषणा

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा महत्त्वाचा का?

अमेरिकेत दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका होतात आणि विजयी उमेदवार 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतो. अमेरिकेच्या राष्ट्राअध्यक्षपदाची निवडणूक हा लोकशाही व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. निवडणुका जिंकल्यानंतर, शपथविधी समारंभानंतर राष्ट्राध्यक्षांना संविधानाचे पालन करण्याची आणि देशाला पुढे नेण्यासाठी पूर्ण शक्ती वापरण्याची जबाबदारी मिळते. ही शपथ अमेरिकन लोकशाहीच्या ताकदीचे आणि जगभरातील तिच्या संस्थांच्या स्थिरतेचे प्रतीक मानले जाते.

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी आघाडी, कमला हॅरिस पिछाडीवर; वाचा, कुणाला किती मते..

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांना कोण शपथ देतं?

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांना शपथ देण्याची जबाबदारी अमेरिकेच्या सरन्यायाधीशांवर असते. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीची प्रक्रियेत सर्व प्रथम निवडणुकीनंतर, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निकाल अधिकृतपणे जाहीर केले जातात. इलेक्टोरल कॉलेजचे निकाल नोव्हेंबरमध्येच जाहीर झाले असले तरी, जानेवारीपर्यंत त्याची औपचारिक पुष्टी केली जाते. याची पुष्टी झाल्यावर विजयी उमेदवाराचा शपथ घेण्याचा मार्ग मोकळा होतो.

Sharad Pawar: मला त्या रस्त्याने जायला लावू नका… अन्यथा तुम्हाला कुणी वाचवू शकत नाही -शरद पवार

शपथविधी समारंभ सामान्यतः 20 जानेवारी रोजी आयोजित केला जातो. हा दिवस विशेषतः वॉशिंग्टन डीसीमधील नॅशनल मॉलवर आयोजित केला जातो, जेथे हजारो लोक शपथविधी समारंभास उपस्थित असतात. येथे एक मोठा स्टेज तयार केला आहे , ज्यावर निवडून आलेले राष्ट्राध्यक्षांसह इतर सरकारी शपथ घेतात.

शपथपत्रात काय?

राष्ट्राध्यक्षांना दिली जाणारी शपथ सोप्या पण विशिष्ट शब्दांत आहे , यात “मी शपथ घेतो (किंवा प्रतिज्ञा करतो) की मी युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाची निष्ठापूर्वक अंमलबजावणी करीन आणि माझ्या क्षमतेनुसार, राज्यघटनेचे जतन, संरक्षण आणि रक्षण करीन.

खास परेडचेही केले जाते आयोजन

शपथविधीनंतर, नवीन राष्ट्राध्यक्ष भाषण देतात आणि त्यानंतर खास लाल परेड केली जाते. ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि इतर प्रमुख नेते व्हाईट हाऊसपासून कॅपिटल हिलपर्यंत चालत जातात. याशिवाय शपथविधीनंतर रात्री भव्य इंऑग्यूरल बॉलचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये राष्ट्राध्य़क्ष आणि फस्ट लेडी यांच्यासह इतर उच्च पदस्थ अधिकारीदेखील उपस्थित असतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube