Ravindra Dhangekar On Pune Police : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहे. यातच 21 ऑक्टोबरच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) मोठी कारवाई करत एका खाजगी वाहनातून तब्बल 5 कोटी रुपये जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणावरून सध्या विरोधक सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका करत आहे. यातच काँग्रेस नेते आणि कसबाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, निवडणुकीमध्ये प्रत्येक आमदाराला वीस कोटी रुपये वाटण्यासाठी आले आहेत. मी तर लक्ष्मी फोटो दिवाळीसाठी लोकांना वाटत होतो मात्र यांनी माझी लक्ष्मी चोरली आणि आता भाजपचे लोक निवडणुकीमध्ये वीस कोटी पेक्षा जास्त पैसे वाटणार आहे असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना केला. तसेच सगळी यंत्रणा भाजपने हायजेक केली आहे. असा आरोपही यावेळी त्यांनी केला.
तर कारमध्ये शहाजी बापू पाटिल यांची लोक होती हे समोर आलं आहे आणि आधी 15 कोटी रकम सांगण्यात आली नंतर 5 कोटी सांगण्यात आली मात्र नेमके पैसे कुणाचे आहेत याचा उत्तर पोलीस देत नाही असं देखील ते म्हणाले. तर दुसरीकडे ड्रायव्हरने सांगितल की हे पैसे शहाजी पाटिल यांचे आहेत त्यांच्य्यावर करवाई करण्यात येत नाही आणि हा आचारसंहितेचा भंग आहे मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही असेही यावेळी ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना आमदार रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले की,पोलिसांच्या माध्यमांतून पैसे वाटले जात आहेत. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि या प्रकरणाचा पूर्ण तपास करण्यात यावा अशी मागणी देखील आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. तसेच पोलिसांनी 5 कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदाराच्या घरापर्यंत पोहचवले असा आरोप देखील यावेळी त्यांनी पोलिसांवर केला तसेच या प्रकरणात मी आज पत्र देऊन माहिती घेणार आहे जर माहिती नाही मिळाली तर उद्या काय करायचं ते आम्ही ठरवू असा इशाराही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
यादी नाही थेट शरद पवारांकडून एबी फॉर्मचं वाटप, पारनेरमध्ये शिवसेनेला धक्का देत राणी लंकेंना संधी
पुण्याचे कमिश्नर हे भाजपचा अजेंडा राबवतात म्हणुन माझ्यावर गुन्हा दाखल केला. माझ्यावर आरोप केले गेले सगळे खोटे आहेत गेलीं 25 वर्ष आम्ही दिवाळीत या वस्तू वाटतो माझ्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत. पोलीस आयुक्त बटीक म्हणुन काम करत आहेत. असा देखील आरोप माध्यमांशी बोलताना आमदार रवींद्र धंगेकर यांनी लावला.