Download App

शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का?; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य

शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलंय. ते सांगलीत आयोजित सभेत बोलत होते.

Sadabhau Khot News : शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलंय. विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असतानाच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राज्यभरात जोरदार सभांचा धडाका सुरु आहे. भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या प्रचारार्थ सांगलीच्या जतमध्ये महायुतीची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भाषण करीत वादग्रस्त वक्तव्य केलंय.

‘अनुपम खेर यांच्यासारखा दुसरा कोणी नाही!’ सूरज बडजात्या यांनी 40 वर्षांच्या कारकीर्दीच्या सन्मानार्थ लिहिले पत्र

पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, आपण शेतकरी आहोत. आपल्या घरात गाय असते तसं राज्याची तिजोरी ही गाय असते. गायीला चार थान आहेत. त्यातील अर्ध थान वासराला पाजायचं म्हणजे जनतेला आणि साडेतीन थानातंल दोन थानाचं दूध आपणच हाणायचं, असं शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाल्यांनी सांगितलं पण फडणवीस म्हणाले, चारही थानं वासराचीच आहेत, मी सगळं दूध वासरालाचं देणार. त्यानंतर शरद पवार यांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या. आता माझ्या चिल्यापिल्यांचं काय होईल, असं पवारांना वाटलं. पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी बॅंका, कारखाने, सुतगिरण्या हाणल्या एढं हाणलं तरीही तुम्हाला महाराष्ट्र बदलायचायं,
शरद पवार तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असा थेट सवाल सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना केलायं.

जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा ‘ट्रम्प’ यांच्या हातात; राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी कसा होतो?

तसेच संपूर्ण राज्याचं लक्ष जत विधानसभा निवडणुकीकडे लागलंय. बहुजन समाजाचा ढाण्याच वाघ जतमध्ये उभा राहिलायं. काहींना तर गोपीचंद पडळकर जेवताना वाटीतल्या भाजीतही दिसायला लागलायं. काही लोकं आता बोलतात की हे बाहेरुन आलंय पण हे बाहेरुन कुठून पाकिस्तानातून आलंय का? तुमच्या सोनियाकाकू कुठून आल्या आहेत हे विचारा त्या इटलीवरुन आल्या तरीही तुम्ही त्यांना लोटांगण घालतायं, हा तर आमच्या मातीतला बहुजन नेता आहे, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केलीयं.

मागून आलेले मंत्री झाले मी अजून किती दाढी पिकवायची?, निलेश राणेंच्या मनात काय..

दरम्यान, राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्योराप आणि टीका-टीप्पणीच्या फैऱ्या झडताना दिसून आहेत. अनेक नेते आपल्या भाषणातून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर शाब्दिक हल्ला करत आहेत. अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केलायं. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या आजा अतिशय खालच्या शब्दांत टीका केली आहे.

follow us