शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5 हजार रुपये द्या, सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5 हजार रुपये द्या, सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sadabhau Khot : राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक ई-पिक पाहणी नोंद नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी आज रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) देखील उपस्थित होते.

यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली होती. मागील वर्षी अंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले, शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी खरिप हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी 5 हजार रुपयांची आर्थिक राज्य सरकारकडून करण्यात येणार असं त्यावेळी अजित पवार म्हणाले होते.

सरकारच्या या निर्णयामध्ये आर्थिक मदत देत असताना ई-पिक पाहणी ॲपद्वारे लागवड नोंद केलेल्याच शेतकऱ्यांना ही मदत मिळेल असे सांगण्यात आलेले आहे मात्र त्यामुळे 50% शेतकरी या आर्थिक सहाय्य मदतीपासून वंचीत राहत आहेत.

7/12 वर ई-पिक पाहणी द्वारे पिकाची नोंद करण्यासाठी सर्व शेतकरी तांत्रिक साक्षर नाहीत तसेच खेडेगावत, शेतशिवारात मोबाईलचा रेंजचा प्रश्न आहे. ई-पिक पाहणी ॲप व्यवस्थीत चालत नाही अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी गत हंगामात पिकाची नोंद केलेली नाही. असं सदाभाऊ खोत म्हणाले.

गेल्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस साठी पिक विमा भरला आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सि.सि.आय. केंद्रावर कापूस विक्री केला आहे. तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन व्यापाऱ्यांना विक्री केलेला आहे.

… म्हणून हसन मुश्रीफ यांनी पवारांची साथ सोडली, रोहित पवारांचा गंभीर आरोप

या सर्व नोंद ग्राह्य धरून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी या भेटीदरम्यान सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube