दोन चार महिन्यात विशाल पाटलांना लांब मिशा आल्या…; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
Gopichand Padalkar : सांगलीत ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा (OBC Aarakshan Bachaw Mahaelgar Melawa) आज झाला. या मेळाव्यात बोलताना भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यावर जोरदार टीका केली. खासदार विशाल पाटील येथे सभा घेऊ नका असे सांगत होते. दोन चार महिन्यातच त्यांना लांब लांब मिशा आल्या, अशी टीका पडळकरांनी केली.
Chhagan Bhujbal : ‘आठ आमदार निवडून आणून दाखव’, भुजबळांचं थेट जरांगेंना चॅलेंज
आज सांगलीत ओबीसींचा आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा झाला. त्या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके उपस्थित होते. या वेळी सभेला संबोधित करतांना पडळकर म्हणाले की, प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात आज ओबीसी महाएल्गार मेळावा पार पडत आहे. आमचा विरोध आहे म्हणून एकत्र आलो नाही. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे, त्याला ओबीसी नेत्यांचा विरोध नाही. आमचा विरोध सगे-सोयरे अधिसूचनेला आहे, असं पडळकर म्हणाले.
‘आजीबाई जोरात’ नाट्याची रसिकांमध्ये क्रेझ, ‘या’ दिवशी पुण्यात होणार सुवर्ण महोत्सवी प्रयोग
आज ओबीसींमध्ये घुसखोरी सुरू आहे, त्याच्याविरोधात हा लढा सुरू आहे. आरक्षण देण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात आरक्षण हे पितृसत्ताक पद्धतीने दिले जाते. त्यामुळे आमचं सगेसोयरेला विरोध आहे. सगेसोयरे आरक्षण मिळणार नाही, हे मराठा समाजालाही माहीत आहे, असं पडळकर म्हणाले.
पुढं ते म्हणाले, जातीयवादाशी आमचा काहीही संबंध नाही नाही. पण, ओबीसींना आरक्षण देणं हे आमचं काम आहे आणि ते मिळवून देणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
27 टक्के आरक्षण प्रत्येक पक्षाने दिलं पाहिजे
आमचा सगेसोयरेला विरोध आहे, हे सर्व आमदारांकडून लिहून घ्या. आरक्षणाबाबतची भूमिका सर्व पक्षाच्या प्रमुखांनी लिहून दिली पाहिजे, अशी मागणी पडळकरांनी केलीय. विधानसभेत ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण प्रत्येक पक्षाने दिलं पाहिजे असं म्हणत आरक्षणामुळे समाज दुभंगला आहे. मराठा आणि ओबीसींची पोरं आता बोलत नाहीत, हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही, असंही पडळकर म्हणाले.
भुजबळांचा विशाल पाटलांवर निशाणा…
लोक आपली काम घेऊन सांगलीवरून वसंतदादांना भेटायला जायचे. त्यांना भेटालया जाणाऱ्यात एखादा शेतामजूरही असायचा. दादाला भेटायला गेल्यावर उघडा बोडका शेतमजूर पाहून दादा म्हणायचे, अरे कमीज कुठंय? त्याच्या अंगावर कमीज नाही हे पाहून दादा त्याला आपला कमीज द्यायचे…वसंदादा कुठं आणि आताचे त्यांचे वारसदार कुठं… आताची मंडळी म्हणते की, रॅली इथं कशाला घेता? अरे आपल्या वाडवडिलांनी सर्वांना सोबत घेतलं, गोरगरिबांना सोबत घेतलं, त्याची तरी जाण ठेवा, असं म्हणत आम्ही तुमची खासदारी घ्यायला आलो नाही, असं भुजबळ म्हणाले.