Download App

Prakash Ambedkar : EVM हटाव, वंचितकडून स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात

Prakash Ambedkar On EVM : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधकांकडून ईव्हीएममध्ये (EVM) फेरफार करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar On EVM : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधकांकडून ईव्हीएममध्ये (EVM) फेरफार करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस (Congress) , शिवसेना (Shiv Sena) (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील (NCPSP) नेते फ्रंटफूटवर येऊन ईव्हीएमवरून भाजप (BJP) आणि निवडूक आयोगावर (Election Commission) टीका करत आहे. तर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील पक्षातील पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम विरोधात पुरावे शोधण्याचे आदेश दिले आहे.

तर आतावंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी आज अकोल्यात ईव्हीएम हटाव मोहीम सुरू केली आहे. ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीमेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वाक्षरी करत सुरुवात केली. त्यांनतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी करण्यात आली.

संपूर्ण राज्यात वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएम विरोधात जनआंदोलनाची हाक दिली आहे. त्यांनी आज याची सुरुवात स्वाक्षरी मोहिमेपासून केली असून येणाऱ्या काळात हे आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत संपूर्ण राज्यात ईव्हीएम विरुद्ध जनआंदोलन उभारण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला होता. त्यानुसार आता संपूर्ण राज्यात 3 ते 16 डिसेंबरपर्यंत ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा संविधानाचा खूनच, नाना पटोलेंचा हल्लाबोल

प्रकाश आंबेडकर 2004 पासून ईव्हीएमव विरोधात आंदोलन करत आहे तसेच ते ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढाई देखील लढत आहे. याच बरोबर त्यांनी आतापर्यंत पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबाबत अनेक घोळ देखील समोर आणले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 46 जगावर विजय मिळाला आहे. तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीला एकही जागेवर विजय मिळालेला नाही.

follow us