Nilanga Assembly constituency : माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या मार्गदर्शनाखाली व सकारात्मक विचार असलेले अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नावाने तयार केलेल्या पॅनलला जनतेने बहुमताने निवडून दिले. त्यामुळेच गेली 25 वर्षे तोट्यात असलेली मार्केट कमिटी फायद्यात आणण्यात त्यांच्यामुळेच यश आले व शेतकऱ्यांना याचा फायदा झाला, असे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे (Nilanga Assembly constituency) भाजपा (Bjp)महायुतीचे उमेदवार माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर याना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे प्रतिपादन निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे यांनी केले. ते शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
संविधान सन्मान सभा: संभाजीराव निलंगेकरांसाठी मंत्री आठवले मैदानात !
ते म्हणाले, कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी दूरदृष्टी ठेवून निलंगा येथे बाजार समितीची स्थापना केली. व्यापाऱ्यांना बाजार समितीमध्ये चांगली जागा उपलब्ध करून दिली. त्यांचाच वारसा पुढे जपत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. व्यापारी खरेदीदार हमाल यांच्या संयुक्त बैठका घेऊन वेळोवेळी बाजार समितीमध्ये अधिक धान्य कसे येईल, त्यांना चांगल्या पद्धतीने भाव कसा देता येईल. असे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची पेमेंट वेळेवर मिळत असल्यामुळे निलंगा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल घालण्यामध्ये मोठा कल वाढलाय. सोयाबीन तूर, उडीद, मूग, अशा धान्यांना चांगला भाव मिळत आहे. त्याचबरोबर माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून व युवा नेते अरविंद पाटील यांच्या संकल्पनेतून नर्मदा सॅल्वोन्ट प्लांट आल्यामुळे व्यापाऱ्याला आर्थिक मदत होणार असून शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे चिंचनसुरे यांनी म्हटले आहे.
निलंगा बाजार समितीमधील उपबाजार समिती म्हणून कासारसिरसी येथेही बाजार समितीचे काम चांगले सुरू आहे. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाजार समिती अतिशय सक्षमपणे कार्य करीत असल्याचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे यांनी सांगितले. सकारात्मक विचार असल्यामुळे व मतदारसंघावर अरविंद पाटील निलंगेकर यांचे विशेष लक्ष असल्याने शेतकऱ्यांचा फायदा हीच बाजार समितीचे व शेतकऱ्याची उन्नती हे धोरण बाजार समिती मधून आखण्यात येत आहेत.
समाज कल्याण विभागाचा सभापती एक मागासवर्गीय समाजातील व्यक्ती संजय दोरवे यांना केले. निलंगा बाजार समितीमध्ये सभापती सन्मानाचं पद नाव असतानाही माझ्यासारख्या लिंगायत समाजातील कार्यकर्त्यालाही निलंगा बाजार समितीचे सभापतीपद देऊन एक माझा मान सन्मान व समाजाचा सन्मान वाढवला. त्याच बरोबर लातूर येथील बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा लातूर येथे जो होता. तो पुतळा हालवू न देण्याबाबत कठोर भूमिका घेऊन त्यांनी थेट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून तो पुतळा त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून निलंगा मतदारसंघाचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर अतिशय सक्षम सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे.