Download App

हा तुमचा भ्रम; ‘शिवसेना राष्ट्रवादी संपवण्याचं काम’ म्हणणाऱ्यांना गोगावलेंनी सुनावलं!

भाजपने राष्ट्रवादी शिवसेना संपवण्याचं काम केलं असं समजणं हा महाविकास आघाडीचा भ्रम असल्याचं प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी दिलंय..

Bharat Gogawale News : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कालचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. विधानसभेचा प्रचारही सुरु आहे. प्रचारांमधून महाविकास आघाडीकडून महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांवर सडकून टीका केली होता. या टीकेवरुन शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी कडक शब्दांत सुनावलंय. भाजपने राष्ट्रवादी शिवसेना संपवण्याचं काम केलं असं समजणं हा महाविकास आघाडीचा भ्रम असल्याचं प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी दिलंय.

माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ शिंदे मात्र..काय म्हणाले फडणवीस?

पुढे बोलताना गोगावले म्हणाले, महायुतीमध्ये शिवसेनेचे 40 आमदार होते पण आम्हाला 80 पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. विरोधक फक्त आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. कोणीही त्यांच्या भुलथापांना बळी पडू नये, आमची युती घट्ट असल्याचं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलंय.

मोठी बातमी! नांदगावमध्ये आमदार सुहास कांदेंविरोधात गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

तसेच महायुती सरकारने केलेले चांगले काम त्यांना पचनी पडत नाही. लाडकी बहिण योजनेत आम्ही नोव्हेंबरचे पैसेही बँक खात्यात जमा केले. याचा अर्थ आम्ही निश्चिंंत आहोत की, आमचे पुन्हा एकदा सरकार येईल आणि ही योजना पुढे चालू ठेवून. या योजनेमध्ये टप्प्याटप्यात आणखी वाढ कशी करता येईल, याचाही विचार करु. लाडक्या बहिणींबरोबर लाडक्या मातांचाही प्राधान्याने विचार करणार असल्याचं गोगावलेंनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आणि सत्ताएधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरु आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुद्दा, महायुतीतील घटक पक्षांना मिळालेल्या जागांवरुन विरोधकांकडून महायुतीला टार्गेट केलं जात असल्याचं दिसून येत आहे.

follow us