खेडकरांचं अख्खं कुटुंबच ‘झोलकर’! लोकसभेला पत्नीशी मनोमिलन, विधानसभेला विभक्त…
Dilip Khedkar : पूजा खेडकरचे वडील लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) रिंगणात उतरले आहेत. त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव विधानसभा मतदारसंघातून (Shevgaon Assembly Constituency) अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. महत्वाचं म्हणजे, या उमेदवारी अर्जात आपण घटस्फोटित असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र, सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना त्यांनी आपण विवाहित असल्याचे सांगितले होतं.
विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय काहीच नाही; वळसे पाटलांचा घणाघात
दिलीप खेडकर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. खेडकर यांनी मंगळवारी (दि. 29 ऑक्टोंबरला) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात पत्नी मनोरमा खेडकर यांच्याविषयी माहिती दिली होती. प्रतिज्ञापत्रात त्यांनी मनोरमा यांचा पत्नी असा उल्लेख केला होता. सोबत संयुक्त मालकीच्या मालमत्तेची माहिती दिली होती.
विरोधकांचा रडीचा डाव; बापू पठारेंविरोधात डमी उमेदवार दिल्याने सुरेंद्र पठारेंची टीका
दरम्यान, आता विधानसभेला अर्ज करतांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मनोरमा यांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळण्यात आला. त्यांनी आपण घटस्फोटित असल्याचं नमूद केलं. पत्नीच्या कॉलममध्ये ‘लागू नाही’ असे लिहिलंय.
दिलीप खेडकर यांच्या शपथपत्रानुसार, त्यांच्यावर विनयभंग, जीवे मारण्याची धमकी आदी गुन्ह्यांची नोंद आहे. दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये दोघेही पती-पत्नी सहआरोपी आहेत.
दिलीप खेडकर यांची एकूण संपत्ती किती?
दिलीप खेडकर यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 8.91 लाख रुपयांचे सोने आणि 31 एकर जमीन आहे. पनवेल, भालगाव, अहिल्यानगर येथे दीड कोटींचे फ्लॅट आहेत. तसेच त्यांनी 2022-23 मध्ये 43.59 लाख रुपये उत्पन्न दाखवले आहे.