उस उत्पादकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात! अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये आंदोलन सुरू

Swabhimani farmers' organization च्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील घोटण या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Swabhimani Farmers' Organization

Swabhimani farmers’ organization in field for sugarcane producers! Protest in Shevgaon, Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील घोटण या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन चालू करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून भाव वाढ व काटेमारीच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे.

मोठी बातमी! संजय राऊत यांची तब्येत बिघडली; उपचारांसाठी रुग्णालयात केलं दाखल

यामध्ये ऊसाला तीन हजार तीनशे रुपये भाव जाहीर करावा व मागील वर्षीचे 300 रुपये द्यावेत तसेच काट्यामध्ये होणारी काटे मारी थांबवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मा खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्या नगरचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटण या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे.उसाच्या चालू गळीत हंगामामध्ये ऊस कारखानदारांनी ऊसाला तीन हजार तीनशे रुपये भावजाहीर करावा व मागील वर्षीचा राहिलेला फरक द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

संध्या शांताराम यांच्या आठवणींना उजाळा; ‘झनक झनक पायल बाजे’ चे खास प्रदर्शन

नियमानुसार ऊस कारखाने सुरू होण्याअगोदर ऊस दर जाहीर करणे अपेक्षित असते.. परंतु काही कारखान्यांनी आपले उसाचे दर जाहीर न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा पवित्रा घेतला असल्याचे जिल्हाध्यक्ष लवांडे यांनी सांगितले. तसेच ते यावेळी बोलताना म्हणाले की, काही साखर कारखान्याचे वजन काटे हे फॉल्टी असल्याकारणाने त्यांचे वजन काटे हे वजन निरीक्षक यांच्याकडून तपासून घ्यावेत, तसेच शेतकऱ्यांना आपल्या उसाचा कोणत्याही काट्यावर वजन करण्याचा अधिकार असावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

follow us