Download App

विजय तर वळसे पाटलांचाच; भेटीदरम्यान आढळरावांनी जयंत पाटलांना सांगून टाकलं

शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी दिलीप वळसे पाटील हेच 100 टक्के निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

  • Written By: Last Updated:

Shivajirao Adhalrao Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) तर शरद पवार गटाकडून देवदत्त निकम (Devdutt Nikam) रिंगणात आहेत. आंबेगावमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटी (Shivajirao Adhalrao Patil) यांनी दिलीप वळसे पाटील हेच 100 टक्के निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

महायुतीच्या योजनांमुळेच गोरगरिबांचं उत्पन्न वाढलं; संभाजीराव पाटील निलंगेकर 

देवदत्त निकम यांच्याविरोधात आंबेगाव मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी जयंत पाटलांनी घेतलेल्या भेटीविषयी भाष्य केलं. ते म्हणाले, जयंत पाटील आणि माझ्यात काल कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, तरीही माध्यमात जयंत पाटील आणि आढळराव पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याच्या बातम्या झळकल्या. मात्र, अशी कोणतीही चर्चा झाली. खरंतर जयंत पाटील यांचे हेलिकॉप्टर माझ्या शाळेत उतरवण्याची परवानगी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे मागितली. वळसे पाटील यांच्याशी चर्चा करूनच मी त्यांना हेलिकॉप्टर माझ्या शाळेत उतरवण्याची परवानगी दिली होती, असं आढळराव पाटील म्हणाले.

शेवगावची जनता दडपशाहीला थारा देणार नाही, आमदार मोनिका राजळे कडाडल्या… 

ते म्हणाले, माझ्या शाळेत आल्यानंतर जयंत पाटील यांनी मला फोन केला. चहा पिण्यासाठी येऊ का? अशी विचारणा केली. त्यावर मी पाहुणचाराच्या उद्देशाने त्यांना चहा पिण्यासाठी बोलावले. मात्र, बातम्या बंद दाराआड चर्चा अशा आल्या. या बारीक सारिक गोष्टी निवडणुकीवर परिणाम करत असतात. मात्र, माझ्या मनात एक आणि ओठावर एक असं बिलुकल नाही. आमच्यात कोणताही बंद दाराआड चर्चा झाली नाही. मी वळसे पाटलांसोबतच आहे. जयंत पाटलांनी मला विचारलं वळसे पाटलांचं काय सुरू आहे, तर उलट मी त्यांना सांगितलं की, वळसे पाटील १०० टक्के निवडून येतील, असं आढळराव पाटील म्हणाले.

ते म्हणाले, विकास काय असतो ते दिलीप वळसे पाटील यांनी दाखवून दिले, आंबेगाव शिरूर मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे वळसे पाटील केली. आंबेगाव तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या पटलावर आणण्याचे काम वळसे पाटील यांनी केले.त्यामुळं वळसे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असं आवाहन त्यांनी केलं.

 

follow us