Download App

ठाकरे गटात वाद उफाळला ! कट्टर शिवसैनिक रणजित पाटीलच तानाजी सावंत यांच्याविरोधात उमेदवार हवेत

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासात करणारांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी रणजित पाटील हेच उमेदवार असायला हवेत.

  • Written By: Last Updated:

Paranda Assembly Constituency: विधानसभा निवडणुकीचे बिगुल ( Assembly Election) वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहेत. त्यात काही ठिकाणी दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात केले जाणार असल्याचे राजकीय घडामोडीमध्ये दिसून येत आहे. पण धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा ( Paranda Assembly Constituency) मतदारसंघात मात्र उमेदवारीवरून ठाकरे गटामध्ये ( Uddhav Thackeray group) वाद उफाळून आला आहे. ठाकरे गटाकडून काँग्रेसमधील पदाधिकारी पक्षात घेऊन त्याला उमेदवारी दिली जाऊ शकते, तसे बोलणी सुरू झाल्याचे बोलले जात आहेत. त्यावरून शिवसैनिकांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे. तसेच काही जणांनी थेट मातोश्री गाठत आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निष्ठावंत शिवसैनिक रणजित पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

परंडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदार संघातून तानाजी सावंत हे निवडून आलेले आहेत. परंतु शिवसेना फुटल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. ते सध्या आरोग्यमंत्री आहेत. धनुष्य बाणावर निवडून आलेल्या उमेदवाराने गद्दारी केली आहे. त्याला धडा शिकविण्यासाठी कडवट शिवसैनिकच उमेदवार हवा आहे. माजी आमदार तथा शिवसेना नेते दिवंगत ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील हे या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकवतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासात करणारांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी रणजित पाटील हेच उमेदवार असायला हवेत, अशी मागणी मातोश्रीवर जाऊन परंडा तालुक्यातील जुन्या शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

रणजित पाटलांना विरोध कुणाचा?

रणजित पाटील यांच्या उमेदवारीला जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या नेत्यांचा विरोध आहे. ते अन्य पक्षातील उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे. त्यासाठी वाशी येथील पूर्वी काँग्रेस पक्षात मुख्य पदाधिकारी राहिलेल्या नेत्यासोबत बोलणी झाल्याचीही चर्चा सुरू आहे. तर रणजित पाटील यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांनी अद्याप मतोश्रीकडे मागणी न केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या संतप्त भावना असल्याचे एका प्रमुख पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या मागणीवरून धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटात वाद असल्याचे दिसून येत आहे.

follow us