Download App

कराड MIDC फाईव्ह स्टार एमआयडीसीत रुपांतरीत करा, सिंचन योजनेलाही आर्थिक बळ…; अतुल भोसलेंची मंत्री शाहांकडे मागणी

कराडच्या एमआयडीसीला फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये रुपांतरीत करावं, सहकारी तत्वावर असणारी सिंचन योजनेला आर्थिक बळ द्यावं

  • Written By: Last Updated:

Atul Bhosale : कराडवासियांच्या आणि इथल्या युवकांच्या भाजपकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यासाठी कराडच्या एमआयडीसीला (MIDC of Karad) फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये रुपांतरीत करावं, सहकारी तत्वावर असणारी सिंचन योजनेला आर्थिक बळ द्यावं, अशा मागण्या भाज उमेदवार अुतल भोसलेंनी (Atul Bhosale) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे केल्यात. ते आज कराडमध्ये बोलत होते.

येवा कोकण आपलोच असा…. पालकमंत्री रविंद्र चव्हाणांकडून विकासाला चालना 

आज सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदार संघात केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेला खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंसह अन्य भाजप नेते उपस्थित होते. यावेळी बोलतांना अतुल भोसले म्हणाले की, युवकांच्या मोठ्या अपेक्षा भाजप, पंतप्रधान मोदीजी आणि अमित शाह यांच्याकडून आहे. त्यामुळे कराडच्या एमआयडीसीला फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये रुपांतरीत करावं, अशी गळ भोसले यांनी मंत्री शाह यांना घातली. यंदा कडामध्ये भाजपचं कमळ फुलणारच असा विश्वासही भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

फिर एक बार सुनील अण्णा मावळचे आमदार..?, भाजप पदाधिकारी शेळकेंच्या बाजूने… 

सिंचन योजनेला बळ द्या…
पुढं बोलताना भाोसले म्हणाले की, दक्षिण कराड मतदारसंघात उसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. अमित शाह हे सहकारी मंत्री झाल्यावर उस उत्पादकांसाठी त्यांनी मोठे निर्णय घेतले. एफआरपीवर लागलेला इनकम टॅक्स माफ करण्याचं काम शाह यांनी केली. इथली सिंचन योजना सहकारी तत्वावर आहे. तुम्ही या योजनेला आर्थिक बळ दिलं तर सिंचन योजना पुर्नगठीत व्हायला मदत होईल, असंही भोसले म्हणाले.

कराडमध्ये लोकांना पक्के घरं नाहीत. गेल्या पाच-पन्नास वर्षापासून लोक पक्क्या घरांसाठी प्रयत्न करत आहे. कराडने कॉंग्रेसचा एक मुख्यमंत्री दिला. मात्र, त्यांच्या काळातही लोकांना पक्की घरं मिळाली नाहीत. त्यामुळं आता केंद्रातील भापज सरकारने पुढाकर घेऊन पंतप्रधान आवास योनाजेअंतर्गत इथल्या लोकांना पक्की घरं द्यावीत, असं भोसले म्हणाले.

दरम्यान, कराड दक्षिणमध्ये कॉंग्रेसकडून माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण हे रिंगणात आहे. तर भाजपने अतुल भोसलेंना उमेदवारी दिली आहे. चव्हाण यांच्या सारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान भोसले कसे पेलणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us