Vidhansabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड मतदारसंघासाठी (Kotharud) आता ठाकरे गटाने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate) यांना रिंगणात उतरवलं. खुद्द चंद्रकांत मोकाटे यांनी याबाबत माहिती दिली.
शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात दिला तगडा उमेदवार
चंद्रकांत मोकाटे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, सप्रेम जय महाराष्ट्र! आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपली सेवा करण्यासाठी शिवसेना महाविकास आघाडीकडून कोथरूड मतदार संघातून मला अधिकृत उमेदवारी दिली आहे.
आपल्या सर्वांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी मी कटीबद्ध राहील, असा आपणास विश्वास देतो, असं मोकाटे यांनी लिहिलं.
पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी हडपसर आणि कोथरूड या दोन जागा ठाकरे गटाला मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने हडपसरमधून माजी आमदार महादेव बाबर यांचे नाव चर्चेत होते. मात्र, या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार असल्याने हा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला गेला. तर कोथरूड मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला आला. आता एकेकाळचा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या कोथरून मतदारसंघावर ठाकरे गटाने पुन्हा भगवा फडकवण्यासाठी ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला. कोथरूड मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. आज ठाकरेंनी कोकाटे यांना एबी फॉर्म दिला आहे.
फरार झालेल्या वसंत देशमुखच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; जयश्री थोरातांबद्दल आक्षेपार्ह विधान
विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या. मात्र, या याद्यांमध्ये कोथरूड मतदारसंघातून अद्याप कुणालाही उमेदवारी दिली नव्हती. कोथरूडच्या जागेसाठी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यासह पृथ्वीराज सुतार हे इच्छुक होते. आता ठाकरेंनी कोकाटे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं.
त्यामुळे आता कोथरूडमध्ये चंद्रकांत मोकाटे विरुद्ध चंद्रकांत पाटील यांच्यात सामना होणार आहे.
दरम्यान, भाजप – शिवसेना महायुती संपुष्टात आल्यानंतर तसेच पक्षफुटीनंतर ठाकरे गटाची ताकद कोथरूडमध्ये कमी झाली. शिवाय, कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांचं तगडं आव्हान मोकाटे यांच्यासमोर आहे. त्यामुळं या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाचा चांगलाच कस लागणार आहे. या मतदारसंघात आता मोकाटे चंद्रकात पाटील यांना कशी लढत देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.